उर्से खिंडीत कोसळली दरड

By Admin | Updated: July 4, 2016 02:10 IST2016-07-04T02:10:28+5:302016-07-04T02:10:28+5:30

पहिल्याच पावसात उर्से खिंडीत रविवारी सकाळी दरड कोसळली

Ursa crashed collapsed rift | उर्से खिंडीत कोसळली दरड

उर्से खिंडीत कोसळली दरड


उर्से : पहिल्याच पावसात उर्से खिंडीत रविवारी सकाळी दरड कोसळली. त्यामुळे पुन्हा एकदा येथील वाहनचालकांच्या सुरक्षितेतचा प्रश्न उभ राहीला आहे. खिंडीत वारंवार दरडी कोसळत असूनही कुठलीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे. आयआरबीच्या व रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्षपणामुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. उर्से खिंड पंचक्रोशीतील गावांसाठी वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. खिंडीजवळच द्रुतगती महामार्ग झाल्याने खिंडीतून वाहतूक वाढली. त्यामुळे १५ वर्षांपूवी या खिंडीचा विस्तार करण्यात आला. खिंडीत दर वर्षी पावसाळ्यात दरड कोसळत असतात. सुरक्षिततेच्या उपाययोजना होत नसल्याने या खिंडीतून जाताना जीव मुठीत घेऊन वाहनचालकांना जावे लागत आहे.
मात्र, अनेक वेळा निवेदन देऊनही याकडे का लक्ष दिले जात नाही? बेजबाबदार व ढिसाळ कामाला जबाबदार आयआरबी, रस्ते विकास महामंडळ पदाधिकारी का कामगार? असा सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत. खिंडीजवळच आयआरबीचे कार्यालय आहे . वाहनचालक अगोदरच येथून जाताना दरड कोसळण्याच्या भीतीने जात असतो. मात्र, या बाजूच्या दरडीमुळे गाडी घसरण्याची व अपघात होण्याची शाश्वती वाढली आहे. घटनेनंतर लगेचच रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दरड हलवण्याचे आदेश दिले.
येथील प्रवास सुरक्षित करण्यासाठी आयआरबी व रस्ते विकास महामंडळाने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करताना माजी सरपंच साहेबराव कारके यांनी केली. अनेक वेळा निवेदन देणारे सुभाष धामणकर यांनीदेखील दरड कोसळल्याबाबत कुठलीच दक्षता घेण्यात येत नसल्याने संताप व्यक्त केला.
कुसगाव, डोंगरगावची जलवाहिनी तुटली
लोणावळा : पाणी योजनेची जलवाहिनी नांगरगाव तेथे इंद्रायणी पात्रात तुटल्याने कुसगाव डोंगरगावसह इतर वाड्या-वस्त्यांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. वलवण धरणावरून नांगरगावमार्गे कुसगाव व परिसरातील गावांसाठी या योजनेची जलवाहिनी नेण्यात आली आहे. ती नांगरगाव येथून नदीपात्रातून गेली आहे. दोन दिवसांपासून लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने इंद्रायणीचे पाणी वाढले आहे. पाण्याचा वेग व जलपर्णी यामुळे ही पाइपलाइन तुटल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे गावांचा पाणीपुरवठा किमान आठ दिवस बंद राहणार असल्याने ऐन पावसात या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवणार आहे.

Web Title: Ursa crashed collapsed rift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.