दासगावमध्ये आज उरूस; कव्वालीचा कार्यक्रम
By Admin | Updated: May 21, 2016 03:17 IST2016-05-21T03:17:47+5:302016-05-21T03:17:47+5:30
शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या दासगाव गावामधील मोहल्ला याठिकाणी असलेल्या रूकनुद्दीन शाह गाझी वली अल्लाह यांचा उरूस शरीफ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

दासगावमध्ये आज उरूस; कव्वालीचा कार्यक्रम
दासगाव : शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या दासगाव गावामधील मोहल्ला याठिकाणी असलेल्या रूकनुद्दीन शाह गाझी वली अल्लाह यांचा उरूस शरीफ मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने शहनशाह गझल जाफर साबिरी व मलिकये तरन्नुम रिहाना चुस्ती या दोन कव्वाल्यांमध्ये शानदार कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
या उरूसचे दासगाव मोहल्ला उरूस कमिटीच्या वतीने गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना तसेच प्रत्येक हिंदूवाडीवर या उरूसाच्या कार्यक्रमांचे निमंत्रण असून हिंदू-मुस्लीम एकता दाखवत मोठ्या संख्येने या उरूसाच्या कार्यक्रमात तसेच कव्वालीच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी असतात. महाड तालुक्यातील दासगांव या गावामध्ये मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये हजरत रूकनुद्दीन शाह गाझी वली अल्लाह यांची शेकडो वर्षांपूर्वीचा दर्गा आहे. परंपरेनुसार दरवर्षी या बाबांचा मुस्लीम धर्माच्या महिन्यानुसार दरवर्षी या बाबांचा मुस्लीम धर्माच्या महिन्यानुसार शाबान महिन्याच्या १३ तारखेला उरूस साजरा करण्यात येतो. यंदा देखील १३ शाबान २१ मे म्हणजे शनिवारी साजरा होत आहे. बजमे शबाब दासगाव यांच्यावतीने हिंदू - मुस्लीम बांधवांना कार्यक्रमास सहभागी होण्याचे आवाहन के ले आहे.