‘पेट्रोलवरील अधिभार तात्काळ मागे घ्या’

By Admin | Updated: April 23, 2017 02:09 IST2017-04-23T02:09:10+5:302017-04-23T02:09:10+5:30

राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलवर प्रतिलिटर तीन रुपये अधिभार लावला. यामुळे अगोदरच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे़

Urgently withdraw the surcharge on petrol | ‘पेट्रोलवरील अधिभार तात्काळ मागे घ्या’

‘पेट्रोलवरील अधिभार तात्काळ मागे घ्या’

नांदेड : राज्य सरकारने शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलवर प्रतिलिटर तीन रुपये अधिभार लावला. यामुळे अगोदरच महागाईच्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे़ त्यामुळे पेट्रोलवरील हा वाढीव अधिभार सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी केली आहे़
पेट्रोलवर अधिभार लावण्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना खा़चव्हाण म्हणाले, राज्य सरकारला कुठलीही आर्थिक शिस्त राहिली नसून सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे़ या सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे राज्याच्या महसुलात मोठी घट झाली आहे़ देशाच्या महालेखापालांनीही अहवालात असेच मत व्यक्त केले आहे़ महामार्गालगत पाचशे मीटर अंतरावरील दारू दुकान बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने सरकारच्या उत्पन्नात घट होणार आहे़ त्याची भरपाई करण्यासाठी सरकारने पेट्रोलवर अधिभार लावला आहे़ मात्र सर्वसामान्यांना भुर्दंड का? असा सवालही त्यांनी केला़ (प्रतिनिधी)

स्थलांतरणाचा घाट
एका पाठोपाठ नांदेड, औरंगाबाद येथील विभागीय कार्यालये स्थलांतर करण्याचा घाट घातला जात असून, त्याचवेळी मराठवाड्यातील प्रकल्पांना निधी द्यायचा नाही, विकासाचे प्रश्न प्रलंबित ठेवायाचे हा जणू सरकारचा अजेंडाच आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री खा़ अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली़
नांदेडमधील पत्रसूचना कार्यालय विरोधानंतरही स्थलांतरित झाले़ महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्यालय, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कार्यालयही औरंगाबादला स्थलांतरित झाले आहे़ आता बँकांच्या विलीनीकरणानंतर स्टेट बँक आॅफ इंडियाचे झोनल कार्यालय स्थलांतरण हालचालींना वेग आला आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Urgently withdraw the surcharge on petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.