मराठी माध्यमाच्या शाळातून उर्दूचे धडे
By Admin | Updated: July 19, 2016 20:24 IST2016-07-19T20:24:35+5:302016-07-19T20:24:35+5:30
राज्यातील निवडक मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू विषयाचे धडे दिले जाणार आहे. या १०० शाळांतील इयत्ता सहावी व सातवीसाठी उर्दू हा विषयक संयुक्त स्तरावर

मराठी माध्यमाच्या शाळातून उर्दूचे धडे
ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि.19 - राज्यातील निवडक मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू विषयाचे धडे दिले जाणार आहे. या १०० शाळांतील इयत्ता सहावी व सातवीसाठी उर्दू हा विषयक संयुक्त स्तरावर प्रायोगिक तत्त्वानुसार सुरू करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ नुसार बहुभाषिक वर्ग हा एक संसाधन म्हणून उपयोगात आणावा, अशी शिफारस आहे, ही शिफारस लक्षात घेता शालेश शिक्षण विभागाने मराठी माध्यमांच्या शाळांमधून उर्दू भाषा विषयाचे अध्यापन करण्याचे निर्देश दिले आहेत. १०० शाळांची निवड करताना जिल्हापरिषद व महापालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या मराठी माध्यमांच्या शाळा व ज्यांच्या परिसरात उर्दू माध्यमांच्या शाळा आहेत, अशा शाळांची निवड प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना करायची आहे. असा बहुभाषिक वर्ग निर्माण केल्याने विविध भाषांमधील शब्दांचे, संकल्पाच तसेच संस्कृतीचे आदानप्रदान होवून विद्यार्थी बहुश्रुत होती. सदर हेतू लक्षा घेऊन या अनुषंगाने शासनाने बदल सुचविले आहे. इयत्ता ६ वी व ७ वीच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधील मराठी या प्रथम विषयासह अन्य विषय शिकविले जातील हिंदी द्वितीय भाषा म्हणून शिकविले जात असताना यात उर्दू संयुक्तपणे शिकविले जाईल.
भारताप्रमाणे महाराष्ट्रातही बहुभाषिक रहिवासी आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात मराठी ही राजभाषा असली तरी इतर नऊ माध्यमांतून शिक्षण घेण्याचे पर्याय विद्यार्थ्यांना दिले आहेत. उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम १ ते ८ वी विषय योजनेस मान्यता दिली आहे.
प्रचलित विषय योजनेत इयत्ता ७ वी पर्यत मराठी माध्यमातीन विद्यार्थ्यांना केवळ मराठी, इंग्रजी व हिंदी या भाषा शिकण्याची मुभा आहे. या विषय रचनेचा विचार करता मराठी माध्यमाच्या शालेय अमराठी भाषिक विद्यार्थी विशेषत: उर्दू भाषिक विद्यार्थी असल्यास ते मातृभाषेच्या शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून म्हणजेच उर्दू शिक्षण औपचारिकरित्या घेता येण्यासाठी प्रचलित विषय योजनेतील मराठी माध्यमाच्या इयत्ता ६ वी व इयत्ता ७ वी च्या विषय रचनेत बदल करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
हिंदीला उर्दूची जोड
१०० मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी (द्वितीय संपूर्ण) ऐवजी हिंदी (संयुक्त), उर्दु (संयुक्त) हे विषय घेता येतील.
प्रचलित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या उर्दू (संयुक्त) या विषयाच पाठ्यक्रम व अनुषंगिक पाठयपुस्तकाचा वापर मराठी माध्यमाच्या शाळामध्ये उर्दु (संयुक्त) अध्यापन करताना करावा.
हिंंदीच्या एकूण चार तासिकांपैकी हिंदी संयुक्त २ तासिका व उर्दू संयुक्त २ तासिका विभाजित करण्यात याव्यात.
प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी
शाळेमध्ये र्उूु विषय सुरू करण्याबाबत जिल्हा शिक्षणाधिकरी (प्राथमिक) यांची मान्यता घेणे आवश्यक राहील.
सदर शासन निर्णय सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये उर्दू शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेच्या परिसरात उपलब्ध असेल, अशा केवळ १०० शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येईल.