शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

शहर सौंदर्यीकरणासाठी ‘अर्बन डिझाइन सेल’

By नारायण जाधव | Updated: April 2, 2025 12:22 IST

Urban Design Sale: व्यवसायवृद्धीसह पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या शहरांचे सौंदर्य वाढविण्यासाठी प्रत्येक शहरात नागरी संरचना समिती अर्थात अर्बन डिझाइन सेलची स्थापना केली जाणार आहे.  त्या-त्या शहरांच्या विकास आराखड्यात तसे बदल केले जाणार आहेत.

- नारायण जाधवनवी मुंबई -  राज्यातील प्रत्येक शहराची स्वतःची विशिष्ट संस्कृती आहे. त्याला पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्यपूर्ण असे महत्त्व आहे. याच आधारे शहरांच्या विशिष्ट सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने आरोग्य सुविधा, वाहतूक व दळणवळणाच्या माध्यमातून शहरातील खाडीकिनारे, जलाशय, हेरिटेज, ऐतिहासिक वास्तू, नैसर्गिक सृष्टी-सौंदर्याची ठिकाणे, वास्तुशास्त्रीय, वैज्ञानिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तू आणि जागांचे जतन केले जाणार आहे. व्यवसायवृद्धीसह पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या शहरांचे सौंदर्य वाढविण्यासाठी प्रत्येक शहरात नागरी संरचना समिती अर्थात अर्बन डिझाइन सेलची स्थापना केली जाणार आहे.  त्या-त्या शहरांच्या विकास आराखड्यात तसे बदल केले जाणार आहेत.

अभियंते, तज्ज्ञांचा समावेश यासाठी शहरनिहाय नागरी संरचना समिती अर्बन डिझाइन सेलची स्थापना करण्याचे निर्देश अध्यादेशाद्वारे नगरविकास विभागाने दिले आहेत. यात ‘अ’ व ‘ब’ वर्ग पालिकांसाठी त्या-त्या शहरांचे आयुक्त, तर इतर शहरांसाठी नगररचना उपसंचालकांच्या अध्यक्षतेखाली ही नागरी संरचना समिती काम करणार आहे. 

समितीत जिल्हाधिकारी, सहायक नगररचना संचालकांसह शहरातील इतिहास, हेरिटेज, शहराचे सौंदर्यीकरण (सिटी अर्बन प्लॅनिंग) क्षेत्रातील वास्तुविशारद, अभियंता यांना निमंत्रित म्हणून घ्यावे, असे नगरविकास विभागाच्या अध्यादेशात म्हटले आहे.

शहरांचे मूळ वैशिष्ट्य अबाधित राहणार- शहराचे मूळ वैशिष्ट्य अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते डिझाइन तयार केले जाईल. संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांचे प्रस्ताव करून  प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना महापालिकेस सुचवेल. - शहरातील व्यवसाय आणि पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने व शहर, जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या वास्तू, हेरिटेज वास्तू, नद्या, तळी, किल्ले, मंदिरे इ. वास्तूंच्या परिसराचे सौंदर्यीकरण अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन प्राधिकरण किंवा जिल्हाधिकारी यांना आवश्यक उपाययोजना सुचवून त्यांच्या अंमलबजावणीची दक्षता घेईल.- नागरी संरचना समितीने शहरातील रस्ते, चौक, तसेच रस्त्यांलगत दोन्ही बाजूंना सुयोग्य रंगसंगती, सौंदर्यीकरणाच्या व वाहतूक दळणवळण सोयीच्या दृष्टिकोनातून नियोजन करून योग्य ते सुशोभीकरणाचे डिझाइन तयार करावे.- समितीच्या सदस्यांनी शहराची संस्कृती, पार्श्वभूमी आणि वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व विचारात घेऊन शहराच्या विशिष्ट सौंदर्यीकरण दृष्टिकोन, आरोग्य सुविधा, वाहतूक व दळणवळण सुविधा या दृष्टिकोनातून व विकास योजनेची परिणामकदृष्ट्या अंमलबजावणीसाठी विकास, प्रादेशिक योजनांचा नियोजित विकास होण्याच्या दृष्टीने नियोजन प्राधिकरणास, जिल्हाधिकारी यांना आवश्यक उपाययोजना सुचवाव्यात.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaharashtraमहाराष्ट्र