युरेनियम प्रकरणी गुन्हा दाखल नाही
By Admin | Updated: December 23, 2016 05:01 IST2016-12-23T05:01:11+5:302016-12-23T05:01:11+5:30
ठाणे पोलिसांनी घोडबंदर रोडवर दोघांकडून पकडलेल्या २४ कोटी रुपयांच्या युरेनियमबाबत गुरुवारी दिवसभर केंद्रीय तपास यंत्रणा

युरेनियम प्रकरणी गुन्हा दाखल नाही
ठाणे : ठाणे पोलिसांनी घोडबंदर रोडवर दोघांकडून पकडलेल्या २४ कोटी रुपयांच्या युरेनियमबाबत गुरुवारी दिवसभर केंद्रीय तपास यंत्रणा (आयबी) तसेच सीबीआयनेही ठाणे पोलिसांकडे चौकशी केली. दरम्यान, याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या सैफुल्ला बजाहदउल्ला खान आणि किशोर प्रजापती या दोघांकडून विशेष माहिती हाती न आल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. ठोस माहिती नसल्यामुळे यासंदर्भात अद्यापही गुन्हा दाखल करता आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आयबीच्या अधिकाऱ्यांनीही या दोघांकडे चौकशी केली. त्यांनाही फारशी काही माहिती हाती लागली नाही. परदेशातून त्यांनी हे युरेनियम आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतात बिहारमध्ये आढळणारे हे युरेनियम तिथून आणले गेले का, याचाही तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)