आगामी वर्ष ‘समता-समरसता’ वर्ष
By Admin | Updated: May 7, 2015 11:31 IST2015-05-07T03:09:00+5:302015-05-07T11:31:27+5:30
महात्मा फुले यांची १२५ वी पुण्यतीथी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधत आगामी वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.

आगामी वर्ष ‘समता-समरसता’ वर्ष
मुंबई : महात्मा फुले यांची १२५ वी पुण्यतीथी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीचे औचित्य साधत आगामी वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समतागौरव व समाजभूषण पुरस्कारांचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, समता-समरसता हे विषय भाषणातून नव्हे तर कृतीतून दाखविण्याचे आहेत याच भूमिकेवर राज्य शासन काम करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ होते. आर्थिक बाबींवरील त्यांचे विचार पथदर्शी होते. त्यांचे आर्थिक विचार समोर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
या वेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, उद्योजक मिलिंद कांबळे, पत्रकार यदू जोशी आणि संगीतकार प्रभाकर धाकडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या वेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होते.
समाजभूषण पुरस्कारांचे मानकरी
संस्था- हॅपी होम अँड स्कूल फॉर दी ब्लाइंड-मुंबई, अन्नपूर्णा परिवार-पुणे, अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्र-पुणे , श्री बाबूराव
राघोजी देशमुख शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा सेवाभावी संस्था-कागल, संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र-लातूर, गोविंद महाराज गोपाल समाज विकास परिषद-निलंगा, दिनदयाल बहु.प्रसारक मंडळ-यवतमाळ, संपूर्ण बांबू केंद्र-अमरावती, बहुभुती शिक्षण संस्था-गोंदिया, मातृसेवा संघ- नागपूर.
समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती : जयश्री कांबळे, दुर्गादास साबळे, चंद्रकांत गांगुर्डे, विनोद प्रजापती, किशोर रोहम, दत्तात्रय पांडव (मुंबई), सुभाष वाणी (रत्नागिरी), मोहन कदम, चंद्रकांत जाधव (सिंधुदुर्ग).