पहिल्या फेरीत UPAचे दिग्गज पिछाडीवर

By Admin | Updated: May 16, 2014 09:16 IST2014-05-16T09:16:38+5:302014-05-16T09:16:38+5:30

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत युपीएचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत.

UPA's veteran trailing in the first round | पहिल्या फेरीत UPAचे दिग्गज पिछाडीवर

पहिल्या फेरीत UPAचे दिग्गज पिछाडीवर

>ऑनलाइन टीम 
मुंबई, दि. १६ - मतमोजणीच्या पहिल्या फेरीत युपीएचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. यामध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अमेठीमधून पिछाडीवर तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरमधून पिछाडीवर आहेत.
नाशिकमधून पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे तब्बल २० हजार मतांनी पिछाडीवर असून काँग्रेसच्या प्रिया दत्त याही पिछाडीवर आहेत. प्रिया दत्त यांच्या विरोधात पहिल्यांदा निवडणूक लढविणा-या पुनम महाजन यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली आहे. भाजपाच्या नेत्या मनेका गांधी या पिलीभितमधून पिछाडीवर आहेत. बागपतमधून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त व भाजपाचे उमेदवार  सत्यपाल सिंग हे आघाडीवर असून अजित सिंह हे पिछाडीवर आहेत. श्रीनगरमधून फारूख अब्दूल्ला हे पिछाडीवर आहेत. जयपूरमधून भाजपाचे राज्यवर्धन सिंह राठोड हे आघाडीवर आहेत. काँग्रेसचे निलेश राणे हे १८ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. चांदणी चौकमधून केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल हे पिछाडीवर आहेत. तर रायबरेलीमधून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आघाडीवर आहेत. नागपूरमधून नितीन गडकरी हे आघाडीवर असून आपच्या अंजली दमानिया पिछाडीवर आहेत. लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार या सासाराममधून पिछाडीवर आहेत. तिरूवनंतरपुरूमधून शशी थरूर पिछाडीवर आहेत. 

Web Title: UPA's veteran trailing in the first round