मुलींवर झाले उपनयन संस्कार

By Admin | Updated: August 17, 2016 21:38 IST2016-08-17T21:38:57+5:302016-08-17T21:38:57+5:30

मुलांचे उपनयन संस्कार करणे, हे सर्वांना परिचित आहे.

The Upaniyan Samskara happened on the girls | मुलींवर झाले उपनयन संस्कार

मुलींवर झाले उपनयन संस्कार

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 17 - मुलांचे उपनयन संस्कार करणे, हे सर्वांना परिचित आहे. परंतू मुलींवर सामूहिक उपनयन संस्कार करण्याचा सोहळा बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील गारखेडा परिसर येथील आर्य समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ३० मुली आणि ७ मुलांवर या कार्यक्रमात उपनयन संस्कार करण्यात आले.
खूप पुर्वी मुलींवर उपनयन संस्कार करण्याची पद्धत प्रचलित होती. याशिवाय उपनयन संस्कार हा केवळ ह्यब्राह्मणह्ण समाजापुरता मर्यादित नसून तो ह्यहिंदूह्ण लोकांचा संस्कार आहे. स्त्री असो अथवा पुरूष प्रत्येक ह्यहिंदू ह्णला तो करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे सामाजिक समता येण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. याच तत्त्वाला अनुसरूण या कार्यक्रमात ब्राह्मण समाजापेक्षा इतर समाजातील बालिकांचे प्रमाण अधिक आढळून आले.
महाराष्ट्रात दिड हजार वर्षांनंतर प्रथमच मुलींवर सामुहिक उपनयन संस्कार करण्यात आले असून शहरात हा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याचे प्रा. रमेश पांडव यांनी सांगितले. शहरवासीयांसाठी तर ही घटना अगदीच नविण्यपुर्ण आहे. यामध्ये ह्यसंजापाह्ण (मुंज या सोहळ्यातील केस कापण्याचा विधी) हा विधी सोडून वैदिक पद्धतीने मुलींची मुंज लावण्यात आली. या कार्यक्रमाचे पौरोहित्यदेखील एका महिला विदुषीने केले. आचार्या नंदिता शास्त्री चतुर्वेदी या खास वाराणसी येथून या कार्यक्रमासाठी शहरात आल्या होत्या. त्यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा पार पडला.
याप्रसंगी प्रा. रमेश ठाकूर, डॉ. लक्ष्मण माने, प्रविण माळी, ज्योती तोष्णीवाल, माधव शास्त्री, प्रतिभा शिंदे, महिपाल व्यवहारे, डॉ. सुजाता क रजगावकर, मंगलमुर्ती शास्त्री , अर्चना गणगे आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
स्वस्तीवचन, शांतीकरणम, मेखला बंधन, संध्या वंदन, गायत्री मंत्राचा उपदेश, आर्शिवचन, आणि हवन असे विधी या संस्कारात समाविष्ठ आहेत. सोळा संस्कारांपैकी एक असणारा उपनयन संस्कार झाल्यानंतर प्रत्येकाला तीन धागे असलेले यज्ञोपवीत (जाणवे) देण्यात आले. या संस्कारानंतर ती व्यक्ती माता-पिता ऋण, गुरू ऋण आणि समाज ऋण फेडण्याचा अधिकारी झाला आहे, असे समजण्यात येते.
आचार्या नंदिता शास्त्री यांनी बालिकांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की मुलींना उपनयन संस्काराचे अधिकार आहेत, याचे दाखले प्रत्येक वेदात आढळून येतात. नंदिता शास्त्री या वाराणसी येथील वेद विद्यालयाच्या प्रधान असून त्यांना चारही वेद मुखोद्गत आहेत. पांढऱ्या रंगाची वेशभुषा करून अत्यंत साधेपणाने बालिका या सोहळ्यासाठी तयार झाल्या होत्या.

Web Title: The Upaniyan Samskara happened on the girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.