रुग्णांच्या हक्कांसाठी पुण्यात होणार अनोखे मतदान !
By Admin | Updated: May 25, 2017 16:11 IST2017-05-25T16:11:54+5:302017-05-25T16:11:54+5:30
जन आरोग्य अभियानातर्फे "आवाज रुग्णांचा, निर्धार जनतेचा" या मोहिमेअंतर्गत रुग्ण हक्कांसाठी जून महिन्यात पुण्यात मतदान घेतले जाणार आहे

रुग्णांच्या हक्कांसाठी पुण्यात होणार अनोखे मतदान !
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - जन आरोग्य अभियानातर्फे "आवाज रुग्णांचा, निर्धार जनतेचा" या मोहिमेअंतर्गत रुग्ण हक्कांसाठी जून महिन्यात पुण्यात मतदान घेतले जाणार आहे. आजवर आपण लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करत आलो. पण आता आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी रुग्णांचे हक्क मिळवण्यासाठी मतदान होणार आहे.
या मतदानात तीन प्रश्न असतील. त्यांची हो किंवा नाही अशी उत्तरे द्यायची आहेत.खासगी हॉस्पिटलच्या मनमानी कारभारावर सरकारचे नियंत्रण असायला पाहिजे का ?, सरकारी हॉस्पिटलमधील आरोग्यसेवांचा दर्जा सुधारण्यासाठी ठोस उपाय केले पाहिजेत का? आणि रुग्णांचे हक्क जपणारा कायदा महाराष्ट्र सरकारने तातडीने कायदा करायला पाहिजे का ? या प्रश्नांचा समावेश आहे.
आपल्या सोसायटीत, कंपनीत, हास्य क्लबमध्ये, ज्येष्ठ नागरिक संघात, गणेश मंडळात, कॉलेजच्या परिसरात 15 ते 30 जूनदरम्यान हे अनोखे मतदान होईल. या मतदानासाठी मतपत्रिका, मतपेटी जन आरोग्य अभियानातर्फे पुरविण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी 4 जून 2017 रोजी लोकायत, तिसरा मजला, लिनोव्हा बिल्डिंग, नळ स्टॉपजवळ, लॉ कॉलेज रोड- सिंडीकेट बँकेसमोर, पुणे येथे सकाळी 10 ते 12 या वेळेत बैठक आयोजित केली आहे.