शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजावर अवकाळी संकट; गारपिटीने हिरावला घास, हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 06:16 IST

गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला.

लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यासह राज्याच्या काही भागांना शुक्रवारीही अवकाळीचा तडाखा बसला. यात काढणीला आलेली पिके मातीमोल झाली. गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाचा हजारो हेक्टरवरील पिकांना फटका बसला.

या पावसाने २१ जनावरांचाही जीव घेतला आहे. हिंगोलीत वीज कोसळून एकाचा, तर परभणीत तिघांचा असे चारजण दगावले तर २२ नागरिक जखमी झाले आहेत. अवकाळीच्या नेमक्या संकटात सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामे  रखडल्याचे चित्र आहे. 

अमरावती जिल्ह्यात गुरुवारी पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसला, शुक्रवारी धारणी तालुक्यात गारपिटीची नोंद झाली आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. परभणीत ३० हजार हेक्टरवरील गहू, ज्वारी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच लातूर जिल्ह्यातही माेठे नुकसान झाले आहे.

आणखी दोन दिवस प्रकोप; काही ठिकाणी यलो अलर्ट

सध्या देशाच्या ८० टक्के भागात अवकाळी पावसाची स्थिती तयार झाली असून, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस कायम राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

मराठवाड्यात शनिवारी गारपिटीचा अंदाज आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत हवामानाची ही स्थिती कायम राहणार आहे. मध्य  महाराष्ट्र,  कोकण,  मराठवाडा  व विदर्भात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली असून, येलो अलर्ट दिला आहे.

संपाचा पंचनाम्यांवर परिणाम

- मराठवाड्यातील ५४ हजार १७१ कर्मचारी संपावर आहेत. विभागातील ४५० मंडळांतील तलाठी, मंडळ अधिकारी रजेवर असल्यामुळे प्राथमिक नुकसानीचा अहवाल ई - पाहणीच्या आधारे केला आहे. 

- १४ मार्चपासून महसूल कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे पंचनामे कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विभागातील सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार, एसडीएमच्या पथकांसह बांधावर पोहोचले व त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस