शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
कॉम्पॅक्ट एसयूव्ही बाजारात ब्रेझाची विक्री घटली; या चार कारना ग्राहक देतायत पसंती...
4
ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
5
नवीन कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना लागेल कमी कर; कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रचना बदलणार असल्याचा फायदा
6
Dog Attack Mumbai: बिबट्यासारखी उडी आणि खांदा पकडला जबड्यात; मुंबईत भटक्या कुत्र्याचा सुरक्षारक्षकावर हल्ला, Video पहा
7
जपान पुन्हा हादरला: ६.७ तीव्रतेचा जोरदार भूकंप, पॅसिफिक किनारपट्टीसाठी त्सुनामीचा इशारा जारी
8
रिस्क घेतली अन् गुंतवणूक वाढली! इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत २१ टक्क्यांनी वाढ; सलग तीन महिन्यांच्या घसरणीला ब्रेक
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला, बस खोल दरीत कोसळली, ९ जण ठार झाल्याची भिती
10
भविष्यातील भारतात अदानी ग्रुपचं काय योगदान असेल?; प्रणव अदानींनी सांगितला संपूर्ण 'प्लॅन'
11
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
12
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
13
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
14
मराठवाड्यातील ७० हजार कुटुंबांना आता हक्काचे घर; ‘मदत माश’ जमिनीवरील घरे नियमित होणार
15
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
16
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
17
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
18
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
19
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
20
Shivraj Patil Death: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 11:23 IST

आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई: ऐन दिवाळीत राज्याच्या विविध भागात कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असताना शनिवारी रात्री व रविवारी राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला. या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकांची नासाडी केली आहे. उत्तर विदर्भासह खान्देशात पावसाचा जोर अधिक होता. आणखी दोन दिवस राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशिकला चोवीस तासांत २९ मिमी 

नाशिक शहरासह जिल्ह्यात शनिवारपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. शनिवारी शहरात रात्रभर संततधार सुरू होती रविवारी (दि. २६) दिवसभर हलक्या-मध्यम सरींचा वर्षाव शहरात सुरूच होता. मागील चोवीस तासांत शहरात  २९ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली.

नंदुरबार जिल्ह्यात २७.१ मिमी पावसाची नोंद

नंदुरबार : जिल्ह्यात शनिवारी रात्री आणि रविवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली.  धडगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. पावसामुळे चांदसैली घाटात दरड कोसळली असून वाहतूक ठप्प आहे. शिवाय शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. जिल्हाभरात पावसाची रिपरिप सुरू होती. २४ तासात सरासरी २७.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली 

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने विदर्भावर अवकाळीचे ढग जमा झाले आहेत. हे सावट पुढचे चार-पाच दिवस राहणार असल्याचा अंदाज आहे. रविवारी चक्रीवादळ व दि. २८ तारखेला पुन्हा तीव्र चक्रीवादळ तयार हाेणार असल्याने विजा व गडगडाटासह पावसाचा जाेर आणखी वाढण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पावसामुळे कपाशी, सोयाबीनला फटका

अकोला जिल्ह्यासह पश्चिम वऱ्हाडात सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: सोंगणी सुरू असलेल्या सोयाबीनसह कपाशी पिकांना या पावसाचा फटका बसला आहे. भिजलेल्या सोयाबीनला आता बाजारात दर मिळणे कठीण झाले आहे.

ढगाळ वातावरण आणि अधूनमधून कुठे मुसळधार, तर कुठे रिमझिम पाऊस सुरू आहे. रविवारी सायंकाळीसुद्धा अकोला शहर व परिसरात पावसाच्या सरी आल्या. या पावसामुळे कपाशी आणि सोयाबीन पिकांना फटका बसला.  पावसामुळे काढणी करून ठेवलेले सोयाबीन भिजले. कपाशीची बोंडे भिजली असल्याने वेचणी रखडली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Unseasonal Rains Lash Maharashtra, Crops Damaged; More Showers Forecasted

Web Summary : Maharashtra faces unseasonal rains, damaging harvested crops like soybean and cotton, especially in Vidarbha and Khandesh. Yellow alert issued. Cyclone threat looms, with forecasts predicting increased rainfall and thunderstorms for the next four to five days.
टॅग्स :MarathwadaमराठवाडाRainपाऊस