कॅमेर्‍यासमोर बालकाशी अनैसर्गिक कृत्य

By Admin | Updated: July 1, 2014 02:22 IST2014-07-01T02:18:02+5:302014-07-01T02:22:51+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे चित्रफीत फेसबुकवर अपलोड दोघांविरुध्द गुन्हा दाखल.

Unnatural act of child in front of camera | कॅमेर्‍यासमोर बालकाशी अनैसर्गिक कृत्य

कॅमेर्‍यासमोर बालकाशी अनैसर्गिक कृत्य

पातुर्डा (बुलडाणा): बालकाशी एकाने अनैसर्गिक कृत्य केले तर दुसर्‍याने भ्रमणध्वनीमध्ये या किळसवाण्या कृत्याची चित्रफीत काढून सोशल मीडियावर अपलोड केली. बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील एका बारा वर्षीय बालकास गावातीलच आशीष उर्फ अविनाश सारंगधर बोपले (वय १९) याने २९ जून रोजी संध्याकाळी मोटारसायकलवर बळजबरी बसवून गावाबाहेरील एका शेतात नेले. त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य करून, त्याची चित्रफीत अनिकेत राजू सातव (वय १६) याने भ्रमध्वनीवर काढली. त्यानंतर ही चित्रफित सोशल मीडियावर अपलोड केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणाची तक्रार पीडित बालकाच्या वडिलांनी तामगाव पोलिस स्टेशनला दिली. त्यानुसार तामगाव पोलिसांनी पातुर्डा येथील आशिष उर्फ अविनाश सारंगधर बोपले आणि अनिकेत राजू सातव यांच्याविरुध्द भादंवि कलम ३७७, ३६३, ५0४, ५३७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ (अ), (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Unnatural act of child in front of camera