अज्ञात ट्रकची दुचाकीस धडक, तीन ठार
By Admin | Updated: September 6, 2016 20:28 IST2016-09-06T20:28:34+5:302016-09-06T20:28:34+5:30
भरधाव वाहनाने दुचाकीस जबर धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाले.

अज्ञात ट्रकची दुचाकीस धडक, तीन ठार
ऑनलाइन लोकमत
मूर्तिजापूर/हातगाव, दि. 6 - भरधाव वाहनाने दुचाकीस जबर धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाले. ही घटना हातगाव येथून जवळच असलेल्या सोनोरी पुलाजवळ ६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बु. पोलीस स्टेशन माना येथील रहिवासी प्रकाश शालीकराम राऊत (४२), देवेंद्र हरिश्चंद्र सरदार (४२) आणि ११ वर्षीय सानिका देवेंद्र सरदार हे तिघे अकोल्यावरून दुचाकी क्रए एम.एच. ३० एएस ३७७९ ने आपल्या गावाकडे जामठी बु. येथे येत होते.
राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील सोनोरी गावानजीक असलेल्या पुलावर खड्डा वाचविण्याचे प्रयत्नात विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. यामध्ये बापलेकासह प्रकाश राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गजानन पडघन आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचून तिन्ही मृतदेह स्थानिक रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतकांची उशिरा ओळख पटली आहे. अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.