शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदासाठी भाजपाच्या 'या' आमदारांना अज्ञाताचा फोन; नेमकं काय आहे प्रकरण? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 14:45 IST

आम्हाला अडकवायचा प्रयत्न नव्हता. पहिल्या फोनपासून आम्हाला हा माणूस बनावट असल्याचं दिसून आले असं भाजपा आमदाराने स्पष्ट केले.

मुंबई - राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचं प्रशासन सांभाळत आहेत. सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे कॅबिनेट विस्तार लांबला आहे. यावरून विरोधकांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला आहे. मात्र याच संधीचा फायदा घेत काही महाठगांनी भाजपा आमदारांना फोन करत मंत्रिपदासाठी पैशाची मागणी केली. 

भाजपा आमदार राहुल कुल म्हणाले की, मला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मी त्याला ओळखत नव्हतो. मंत्रिपदासाठी मी प्रयत्न करू शकतो. प्रथमदर्शनी मला संशय आला. ही माहिती मी वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिसांनी या प्रकरणात सापळा रचून आरोपींना अटक केली आहे. सध्या तपास सुरू आहे. फसवणुकीला बळी पडू नये यासाठी आम्ही पुढाकार घेतला असं त्यांनी सांगितले. 

१०० कोटीत कॅबिनेट मंत्रिपद?; 5 स्टार हॉटेलमध्ये आमदारासोबत झाली बैठक अन्...

त्याचसोबत आम्हाला अडकवायचा प्रयत्न नव्हता. पहिल्या फोनपासून आम्हाला हा माणूस बनावट असल्याचं दिसून आले. आम्ही नेत्यांशी चर्चा करून संबंधित व्यक्तीने अन्य कुणाला फसवू नये यासाठी आम्ही त्याच्या संपर्कात होतो. या प्रवृत्तीला अटकाव घालायला हवा म्हणून फडणवीसांनी पोलिसांना सूचना दिल्या. आमचा एकाशी संपर्क झाला. बाकी कुणाच्या संपर्कात आम्ही नव्हतो. फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई होणं हाच उद्देश होता असं भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी म्हटलं. 

काय आहे प्रकरण?एका आमदाराच्या खासगी सचिवाच्या तक्रारीवरून मुंबई क्राइम ब्रांचनं ४ आरोपींना अटक केली आहे. त्यात रियाज शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी यांचा समावेश आहे. किला कोर्टाने या सर्व आरोपींना २६ जुलैपर्यंत क्राईम ब्रांच कस्टडीत पाठवले आहे. FIR नुसार, आमदार ते मंत्री बनण्यासाठी आरोपींनी १०० कोटींची मागणी केली होती. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठक झाली. मुंबई क्राईम ब्रान्चने मंगळवारी किला कोर्टात या प्रकरणात खुलासा केला. आरोपी रियाज शेखनं आमदाराच्या सचिवाला अनेकदा फोन करू आमदारांची ४ वाजता बैठक आहे परंतु ते फोन उचलत नाही अशी बतावणी केली. त्याच संध्याकाळी ४.३० वाजता दक्षिण मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेल बैठकीला बोलावले. रियाजचा वारंवार आमदाराच्या पीएला फोन आला. त्यात तुम्हाला १०० कोटीमध्ये कॅबिनेट मंत्री बनवतो अशी ऑफर दिली होती. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी या आरोपींना बेड्या ठोकल्या.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेJaykumar Goreजयकुमार गोरेBJPभाजपा