विद्यापीठाचा गोंधळ सुरूच

By Admin | Updated: November 4, 2014 02:45 IST2014-11-04T02:45:56+5:302014-11-04T02:45:56+5:30

मुंबई विद्यापीठाच्या अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपुर्वी हॉलतिकीट मिळाले नसल्याचा गोंधळ संपत नाही

The university's mess was on | विद्यापीठाचा गोंधळ सुरूच

विद्यापीठाचा गोंधळ सुरूच

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अल्केश दिनेश मोदी व्यवस्थापन संस्थेच्या विद्यार्थ्यांना परीक्षेपुर्वी हॉलतिकीट मिळाले नसल्याचा गोंधळ संपत नाही, तोच कणकवलीच्या लक्ष्मीनारायण महाविद्यालयातील बीएमएसच्या विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु झाली तरी हॉल तिकीट न मिळाल्याने विद्यापीठाचा परीक्षेतील गोंधळ पुन्हा समोर आला. मनविसे सिनेट सदस्यांने विद्यापीठाच्या निदर्शनास हे आणून दिल्यानंतर हॉल तिकीटविनाच परीक्षेला बसू देण्यात आले.
कणकवली फोंडा येथील लक्ष्मीनारायण महाविद्यालयाच्या बीएमएसच्या ११ मुलांपैकी ७ मुलांना सोमवारी पेपर सुरु होण्याच्या काही तासांपर्यंत हॉल तिकीट मिळाले नसल्याचा प्रकार समोर आला. मनविसेचे सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी हा प्रकार विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिला. (प्रतिनिधी)

Web Title: The university's mess was on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.