विद्यापीठाच्या १२ हेल्पलाइन्स

By Admin | Updated: April 21, 2015 02:05 IST2015-04-21T02:05:48+5:302015-04-21T02:05:48+5:30

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर काही परीक्षा येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना येणा-या अडचणी महाविद्यालयामध्येच

The University's 12 Helpline | विद्यापीठाच्या १२ हेल्पलाइन्स

विद्यापीठाच्या १२ हेल्पलाइन्स

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत, तर काही परीक्षा येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना येणा-या अडचणी महाविद्यालयामध्येच मार्गी लागाव्यात यासाठी विद्यापीठाने हेल्पलाइन्स सुरू केल्या आहेत. सर्वसाधारण अडचणी, हॉल तिकीट, रिझल्ट आणि इतर अडचणी अशा विविध अडचणींसाठी १२ हेल्पलाइन्स सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. वेळापत्रकाबाबत २६५४३५८७, २६५४३४६१ आणि २६५४३३९२ या क्रमांकावर विद्यार्थ्यांना संपर्क साधता येईल. तर हॉल तिकीट, निकालाबाबत कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी २६५४३४६३, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी २६५४३४६२, वाणिज्य, विधी, मॅनेजमेंट, फार्मसी आणि एमसीए या शाखेतील विद्यार्थ्यांसाठी २६५४३३९९ आणि इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी २६५४३३९५ अशा हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Web Title: The University's 12 Helpline