विद्यापीठच देणार नेट परीक्षेसाठी पेन !

By Admin | Updated: November 12, 2015 03:07 IST2015-11-12T03:07:06+5:302015-11-12T03:07:06+5:30

नेट परीक्षार्थींना आता वर्गात पेन नेण्यास, घड्याळ वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर वर्गातच विद्यापीठातर्फे बॉलपेन देण्यात येणार आहे.

University will give pen for NET test! | विद्यापीठच देणार नेट परीक्षेसाठी पेन !

विद्यापीठच देणार नेट परीक्षेसाठी पेन !

पुणे : नेट परीक्षार्थींना आता वर्गात पेन नेण्यास, घड्याळ वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर वर्गातच विद्यापीठातर्फे बॉलपेन देण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे आता परीक्षेपूर्वी अडीच तास आधी विद्यार्थ्यांना केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे. मागील वर्षीपासून नेट परीक्षेची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतली आहे. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटण्याबरोबरच परीक्षेच्या कालावधीत होणाऱ्या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर मंडळाने ठोस पावले उचलली आहेत. आतापर्यंत परीक्षा केंद्रांवर मोबाइल, टॅबलेट, पुस्तके नेण्यास बंदी होती. आता विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बॉलपेन दिले जातील. त्यानेच प्रश्नपत्रिका सोडवावी, अशा सूचना मंडळाने दिल्या आहेत. तसेच वर्गात भिंतीवरच घड्याळ लावलेले असेल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी अडीच तास आधी म्हणजे सकाळीच सात वाजता केंद्रावर हजर राहावे लागणार आहे. वर्षातून दोन वेळा होणारी नेट परीक्षा २७ डिसेंबरला होणार आहे. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार या वेळेत तीन पेपर होतील. (प्रतिनिधी)

Web Title: University will give pen for NET test!