विद्यापीठीय संशोधन होतेय संकुचित
By Admin | Updated: November 16, 2014 00:45 IST2014-11-16T00:45:14+5:302014-11-16T00:45:14+5:30
एका विशिष्ट जातीतील विद्यार्थी व मार्गदर्शक एका ठरावीक विषयावरच संशोधन करत असल्याचे भीषण चित्र आता विद्यापीठांमध्येसुद्धा दिसू लागले आहे.

विद्यापीठीय संशोधन होतेय संकुचित
पुणो : एका विशिष्ट जातीतील विद्यार्थी व मार्गदर्शक एका ठरावीक विषयावरच संशोधन करत असल्याचे भीषण चित्र आता विद्यापीठांमध्येसुद्धा दिसू लागले आहे. परंतु, त्यामुळे विद्यापीठांतील वातावरण आणि संशोधन क्षेत्र संकुचित होत चालले आहे, अशी खंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी शनिवारी व्यक्त केली.
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीने गो. म. कुलकर्णी जन्मशताब्दीनिमित्त ‘साहित्याचा सामाजिक संदर्भ’ या विषयावरील चर्चासत्रच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. विभागप्रमुख डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ. विद्यागौरी टिळक आदी उपस्थित होते.
कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘पूर्वी उच्चवर्णीय प्राध्यापकाकडे दलित विद्यार्थी आणि दलित प्राध्यापकाकडे उच्चवर्णीय विद्यार्थी विविध विषयांवर संशोधन करत होते. परंतु, आता ही परिस्थिती बदलली आहे. कोणीही कोणाकडे संशोधन करण्याचे वातावरण आता राहिलेले नाही. त्याचप्रमाणो अलीकडच्या काळात दलित साहित्याकडे पाहायलाही कोणी तयार होत नाही.’’ दरम्यान, चर्चासत्रच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. म. पवार म्हणाले, साहित्याचा समाजाशी अपरिहार्य असा संबंध आहे. काही साहित्यकृतीमध्ये समाजाचे चुकीचे चित्रण केले गेले आहे. परंतु, साहित्याकडून वास्तवाची अपेक्षा असते. साहित्यकृतीमध्ये वास्तवाबरोबरच कलाकृती समृद्ध करण्यासाठी आवश्यक घटकांचाही समावेश व्हावा. (प्रतिनिधी)
दलित साहित्याच्या व ग्रामीण साहित्याच्या चळवळींबरोबरच समाजात विविध प्रश्नांवरून निर्माण होणा:या चळवळीसुद्धा महत्त्वाच्या असतात. त्यामुळे लेखकांनी आपल्या साहित्यकृतीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणो याबाबत वक्तव्य करणो गरजेचे आहे. तेव्हाच साहित्यात समाजाचे वास्तव चित्र येऊ शकेल.
- डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
माजी कुलगुरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ