भैया देशमुखांचे अनोखे आंदोलन
By Admin | Updated: July 26, 2014 02:12 IST2014-07-26T02:12:36+5:302014-07-26T02:12:36+5:30
जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैया देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृहाच्या प्रवेशद्वारासमोर लोटांगण घालत मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.

भैया देशमुखांचे अनोखे आंदोलन
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांना शेतीचे पाणी मिळावे, या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भैया देशमुख यांनी सह्याद्री अतिथीगृहाच्या प्रवेशद्वारासमोर लोटांगण घालत मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. या वेळी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी देशमुख यांनी साडी परिधान करून नाटय़मयरीत्या हे लोटांगण घातले.
गेल्या कैक वर्षापासून मंगळवेढय़ातील 35 गावांना शेतीचे पाणी पुरवणारा प्रकल्प राबवण्याची मागणी होत आहे. मात्र आघाडी सरकारने त्याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. 9 जूनला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवेदन देत गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी आझाद मैदानात धरणो आंदोलन करीत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी पाच मिनिटेही नसल्याने मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्यासाठी लोटांगण आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अडवणूक करू नये, म्हणून सकाळी सात वाजताच पोलिसांची नजर चुकवून देशमुख काही कार्यकत्र्यासह आझाद मैदानातून बाहेर पडले. त्यानंतर प्रत्येकी दोन-दोन कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याबाहेर आणि सह्याद्री अतिथीगृहाबाहेर घुटमळत होते. आंदोलनाचा सुगावा लागल्याने सकाळपासून मलबार हिल पोलिसांनी कार्यकत्र्याची धरपकड सुरू केली होती. दुपारी साडेबारा वाजता देशमुख टॅक्सीतून सह्याद्री अतिथीगृहासमोर पोहोचले. पोलिसांनी ओळखू नये म्हणून त्यांनी चक्क साडी नेसली होती. टॅक्सीतून बाहेर पडल्या पडल्याच त्यांनी लोटांगण घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत असलेल्या दोन-तीन कार्यकत्र्यानीही त्यांना साथ दिली.
मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी तातडीने देशमुख यांच्यासह सुमारे 4क् कार्यकत्र्याना ताब्यात
घेतले. (प्रतिनिधी)