अकोल्यात जातीवंत बोकडांचा स्वंतत्र बाजार

By Admin | Updated: September 2, 2016 16:09 IST2016-09-02T16:09:45+5:302016-09-02T16:09:45+5:30

शेतक-यांना योग्य दर मिळावेत याकरिता दलालांना फाटा देत अकोल्यात प्रथमच जातींवत, निरोगी बोकडांचा स्वंतत्र बाजार भरविण्यात येत आहे

Unique market of Kokal goose families in Akola | अकोल्यात जातीवंत बोकडांचा स्वंतत्र बाजार

अकोल्यात जातीवंत बोकडांचा स्वंतत्र बाजार

>- राजरत्न सिरसाट / ऑनलाइन लोकमत
दलालांना फाटा ; पशू विज्ञान संस्थेचा शासकीय स्तरावरील राज्यातील पहिला प्रयोग
अकोला, दि. 2 -  शेतक-यांना योग्य दर मिळावेत याकरिता दलालांना फाटा देत अकोल्यात प्रथमच जातींवत, निरोगी बोकडांचा स्वंतत्र बाजार भरविण्यात येत असून, आतापर्यंत २०० शेतक-यांनी शेळी,बोकडांची नोंद केली आहे. कोणतीही शासकीय मदत न घेता स्थातकोत्तर पशूवैद्यकीय,पशू विज्ञान संस्था व जिल्हा पशूसंवर्धन विभागाच्या वतीने ३ ते १० सप्टेंबरपर्यंत बोकड प्रदर्शन व विक्री बाजार भरविण्यात येत आहे. राज्यातील हा पहिलाच उपक्रम मानला जात आहे.
 
शेतीला पूरक पशूपालन,दुग्ध व्यवसाय रकरण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. बोकड,शेळी,कुक्कुट पालन हे कमी खर्चाच अधिक उत्पादन देतात. यासाठीचे प्रशिक्षण या संस्थेमार्फत देण्यात येत आहे. भविष्यातील बोकड,शेळी उत्पादन व्यवसायाचे महत्व आहे त्यादृष्टीने पूश विज्ञान संस्थेने शेतकºयांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली आहे. अकोल्यात प्रथमच निरोगी व जातिवंत बोकड प्रदर्शन घेण्याचा निर्णय स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशू विज्ञान संस्था व पशुसंवर्धन विभागाने घेतला असून, संस्थेच्या आवारात ३ सप्टेंबरपासून १० दिवस हे प्रदर्शन राहणार आहे. बोकडांची दलालामार्फत विक्री होत असल्याने उत्पादकांना योग्य दाम मिळत नाहीत, ग्राहकांना जातिवंत व निरोगी बोकड मिळावेत व शेतकरी उत्पादकांनाही योग्य दर मिळावेत हा या प्रदर्शनामागील उद्देश आहे.
 
सध्या बोकडाचे दर वाढले असून, पुणे जिल्हयातील लोणंद येथील एका शेतक-याकडील बोकडाची किेंमत ६० हजार रूपये आहे. तर औरंगाबाद जिल्हयात हीच किंमत लाखांवर पोहोचली आहे. बोकड निर्यातीला चांगला वाव असून, नुकतेच नाशिक येथील विमानळावरून १६०० बोकडांची आखाती देशात निर्यात करण्यात आली आहे. पुर्वी कांडला बंदरातून जहाजाने बोकड विदेशात पाठवले जात होते, त्यामुळे बोकडांचा मृत्यू होण्याची भिती होती व ब-याच बोकडांचा जलमार्गाच्या सहा ते सात दिवसाच्या प्रवासत मृत्यू होत होता. आता चार ते पाच तासात जवळच्या देशात निर्यात करण्यात येत आहे.
 
 कमी खर्चाच्या या व्यवसायाकडे शेतकरी वळला तरी निश्चितच शेतक-यांच्या आत्महत्या थांबण्यात मदत होईल, या अनुषंगाने शेळी,मेंढी पालन,कुक्कुट पालन प्रशिक्षण शेतकºयांना देण्यात येत आहे एवढेच नव्हेतर त्यांच्याकडील पशूंना योग्य दर मिळावेत म्हणून विक्री व प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
- डॉ.हेमंत बिराडे, अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशूवैद्यकीय व पशूविज्ञान संस्था,अकोला.

Web Title: Unique market of Kokal goose families in Akola