महालक्ष्मी रेसकोर्सवर अनोखे हेलिपॅड
By Admin | Updated: May 26, 2014 02:19 IST2014-05-26T02:19:45+5:302014-05-26T02:19:45+5:30
या प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून पाहण्यासाठी नुकताच एक सर्हे करण्यात आला. त्यातून सकारात्मक निष्कर्ष मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले

महालक्ष्मी रेसकोर्सवर अनोखे हेलिपॅड
डिप्पी वांकाणी, मुंबई - मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर आता सर्व हवामानात वापरता येईल अशा हेलिपॅडच्या निर्मितीची योजना आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी, एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडिया आणि डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. या प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून पाहण्यासाठी नुकताच एक सर्हे करण्यात आला. त्यातून सकारात्मक निष्कर्ष मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. यानंतर डीजीसीए आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेतली जाईल, असे एएआयच्या अधिकार्यांनी सांगितले. सध्या या ठिकाणी दिवसा कार्यरत असणारे हेलिपॅड आहे. पण आता तेथे दिवसा आणि रात्रीही वापरता येऊ शकेल अशा हेलिपॅडची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. उंचीच्या दृष्टीने तेथे हेलिकॉप्टर उतवण्याची आणि उड्डाणाची अनुकूलता आहे की नाही हे सर्व्हेमध्ये तपासून पाहण्यात आले. त्यात सकारात्मक संकेत मिळाल्याने आता पुढील परवानग्या मिळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पाला रॉयल वेस्टर्न टर्फ क्लबची काही हरकत आहे का, असे विचारता या अधिकार्याने सांगितले की, ही जमीन महाराष्ट्र सरकारच्या मालकीची आहे. त्यामुळे कोणी हरकत घेण्याचा प्रश्न नाही. एकदा डीजीसीएची परवानगी मिळाली आणि निधी मंजूर झाला की कामाला सुरुवात होऊ शकेल. एएआयच्या पश्चिम विभागाचे जनरल मॅनेजर व्ही एस पी चिन्सन यांनी सांगितले की, आमचा सर्व्हे सकारात्मक होता. आता पुढील परवानगीची वाट पाहत आहोत. खर्चाचा अंदाज आताच लावता येणार नाही.