बॉलीवुड आणि थीम पार्कची ठाणोकरांना अनोखी भेट

By Admin | Updated: September 1, 2014 23:50 IST2014-09-01T23:50:40+5:302014-09-01T23:50:40+5:30

ठाण्याच्या धर्तीवर साकरण्यात येणा:या थीम पार्कचा भुमिपुजन सोहळा दिग्दर्शक एन. चंद्रा आणि कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला.

Unique gift to Thanokar of Bollywood and theme park | बॉलीवुड आणि थीम पार्कची ठाणोकरांना अनोखी भेट

बॉलीवुड आणि थीम पार्कची ठाणोकरांना अनोखी भेट

ठाणो : वर्तकनगर येथील अप्पासाहेब पवार उद्यानात बॉलीवुड पार्क आणि घोडबंदर येथे जुने ठाणो नवीन ठाण्याच्या धर्तीवर साकरण्यात येणा:या थीम पार्कचा भुमिपुजन सोहळा दिग्दर्शक एन. चंद्रा आणि कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते संपन्न झाला. या दोनही पार्कमुळे ठाणोकरांना एक आगळी वेगळी भेट मिळणार आहे.
वर्तक नगर येथील उद्यानात भारतीय चित्रपटसृष्टीचा 1क्क् वर्षाचा इतिहास जिवंत केला जाणार आहे. चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके 
यांचा चालता बोलता पुतळा व 
देखावा उभा करुन त्यांना मानवंदना करत या उद्यानात ठाणोकर 
प्रवेश करतील, त्यानंतर 
कृष्णधवल चित्रपटसृष्टी ते 4 डी चित्रपटसृष्टीचा भव्य प्रवास येथे पाहता येणार आहे. 
उद्यानांच्या संरक्षक भिंतीवर चित्रपटांची पोस्टर, एलएडी पॅनलवर मराठी ते हिंदी चित्रपटसृष्टीतील चलचित्रे पाहता येणार आहेत. शिवाय मोगॅम्बो फेम अमरिश पुरी, हृतिक रोशण, रा - वन मधील शाहरुख खान, दक्षिणात्या सुपरस्टार रजनीकांत यांचे पुतळे ठाणोकरांना पाहता येणार आहेत. याशिवाय उद्यानात उभारण्यात येणा:या 4 डी तंत्रज्ञानाचा वापर करुन उभारलेल्या थिएटरमध्ये नागरीकांना चित्रपटाचा आस्वाद घेता येणार आहे. मुघल ए आझम, शिशमहल, प्रभातची तुतारी, राज कपूरचा जोकर देखील येथे साकारण्यात येणार आहे. तसेच झाड व पानांच्या आकारातून अनेक अजरामर दृष्ये येथे पहायला मिळणार आहे. चित्रपटावर आधारीत संग्रहालय, वाचनालय देखील उभारण्यात येणार आहेत.
 दोन टप्यात याचे काम होणार असून पहिल्या टप्यासाठी 14 कोटी आणि दुस:या टप्यासाठी 6 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. तसेच यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पालिकेकडून अंतिम टप्यात आहे. 
घोडबंदर रोड, डोंगरीपाडा येथील महापालिकेच्या आरक्षित भुखंडावर जुने ठाणो नवीन ठाणोच्या धर्तीवर थीम पार्क उभारण्यात येणार असून जुनं ठाणो, नवीन ठाणो रेल्वे स्थानक, बारा बलुतेदारांचा गाव, गणपती विसजर्न थीम, जुने ठाणो आरमार, मासुंदा तलाव, एम.एच.हायस्कुल, कोपिनेश्वर मंदिर, ठाणो जेल, गडकरी रंगायतन नाटय़गृह आदींच्या फायबरच्या प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. तसेच स्ट्रेक्चर वर्कप्रमाणो पाथवे तयार करण्यात येणार असून अंदाजे 25क् स्ट्रीट लाईट बसविण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी 15.9क् कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. 

 

Web Title: Unique gift to Thanokar of Bollywood and theme park