शेती पिकांवर उपचार करणारा अनोखा डॉक्टर !
By Admin | Updated: August 28, 2016 15:08 IST2016-08-28T15:08:01+5:302016-08-28T15:08:01+5:30
मानव व गुरांच्या आजारांवर उपचार करणारे अनेक विविध प्रकारचे दवाखाने सर्वत्र अस्तित्वात आहेत.

शेती पिकांवर उपचार करणारा अनोखा डॉक्टर !
style="text-align: justify;">मनोज पाटील
मलकापूर, दि. २८ - मानव व गुरांच्या आजारांवर उपचार करणारे अनेक विविध प्रकारचे दवाखाने सर्वत्र अस्तित्वात आहेत. परंतु शेतीचाही दवाखानाही असू शकतो ही स्वप्नवत कल्पना बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात साकारली आहे. येथील शेती तज्ञ गणेश विठ्ठल पाटील हे कमी खर्चात शेती पासून भरघोस उत्पादन शेतक-यांना कसे मिळवून देता येईल या दृष्टीने झटत असून त्याचे हे कार्य आजच्या घडीला निश्चीतच वाखाण्याजोगे ठरत आहे.
गणेश पाटील याचे मुळगाव दाताळा असून त्याचे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्ट्रीक इंजीनिअरींग पर्यंत झालेले आहे. शिक्षणानंतर पुणे येथे ९ वर्ष वीज वितरण कंपनीत नोकरी त्यानंतर शेती विषयक वस्तू विक्रीचा व्यवसाय, विद्युत वाहिन्या उभारणीची कामे, उपसा जलसिंचनाची कामे करीत असताना शेतकरी बांधवांचे त्यांचा सातत्याने संपर्क जुळत राहिला दरम्यान शेती व्यवसाय परवडत नाही. शेती व्यवसाय म्हणजे जीवघेणा व्यवसाय अशी नकारार्थी भावना त्यांना नेहमीच कानावर पडत होती. या प्रकाराने ते उव्दीग्न होत होते. त्यानंतर सन १९९६ ला ते इस्त्रायल देशात कृषी प्रदर्शनाला गेले तेथे त्यांनी शेतातील नवनवीन बदल व बदलत्या काळानुरुप शेतीचे प्रयोग प्रत्यक्ष पाहिले.
दरम्यानच्या काळात त्यांनी मुळ गावी दाताळा येथे घेऊ १५ एकर शेतीला आता कसायचे हा चंग मनी बांधला. प्रथम वर्षीच त्यातील ३ एकरमध्ये ५०,००० रुपये खर्च करुन केळीचे पिक घेतले. त्या केळीच्या उत्पादनातून ३ लाख रुपयाचे उत्पन्न मिळविले सदर उत्पन्न म्हणजेच त्या शेतीची खरेदी किंमतच त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर मिरची व कपाशी पिकामध्ये संतुलित खते तसेच सजीवकांच वापर करुन भरघोस उत्पन्न मिळविले.