समुद्रकिनाऱ्यासाठी केंद्रीय मंत्री सहकार्य करणार
By Admin | Updated: May 21, 2016 03:11 IST2016-05-21T03:11:57+5:302016-05-21T03:11:57+5:30
मुरुड-जंजिरा समुद्रकिनारा विकास व सुशोभीकरण कामासाठी रायगडचे खासदार व केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी पुरेपूर सहकार्य करण्यासाठी अभिवचन दिले

समुद्रकिनाऱ्यासाठी केंद्रीय मंत्री सहकार्य करणार
मुरुड / जंजिरा : मुरुड-जंजिरा समुद्रकिनारा विकास व सुशोभीकरण कामासाठी रायगडचे खासदार व केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी पुरेपूर सहकार्य करण्यासाठी अभिवचन दिले असल्याची माहिती नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी दिली.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून अनंत गीते यांच्या हस्ते स्नेहा पाटील यांचा केंद्रीय मंत्र्यांनी रायगड जिल्हा दौरा करताना अलिबाग येथे विशेष सत्कार केला. यावेळी समुद्रकिनारा विकास व सुशोभीकरण याबाबत परिपूर्ण प्रस्ताव तयार करून देण्याची सूचना गीते यांनी केली. सध्या प्राथमिक पातळीवर पर्यटकांना शौचालय तसेच स्नानगृह अशी व्यवस्था तातडीने करून दिली जाणार आहे. यासाठी २५ लाख रु पये अनंत गीते यांच्या सहकार्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे. किनाऱ्याच्या संपूर्ण संवर्धनासाठी सविस्तर प्रस्ताव नगरपरिषदेकडून लवकरात लवकर करून आम्ही देत आहोत. पर्यटन सुविधा व संपूर्ण किनारा सुशोभित करून शहराच्या सांैदर्याला अधिक झळाळी देण्यासाठी आम्ही याचा पाठपुरावा करू असे स्नेहा पाटील म्हणाल्या.
शहराच्या समुद्रकिनारा सुशोभीकरण तसेच पर्यटकांना सागरी सुरक्षा उपलब्ध व्हावी अशा प्रकारचा प्रस्ताव मागील दुर्घटनेनंतर अभ्यासपूर्ण पद्धतीने करण्याची योजना होती. काही सुरक्षा एजन्सीचे सहकार्याने किनाऱ्याचे परीक्षण देखील झालेले आहे. त्यामुळे नगरपरिषदेला केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे योग्यवेळी सहकार्य मिळणार आहे. (वार्ताहर)
२५ लाखांचा निधी : प्राथमिक पातळीवर पर्यटकांना शौचालय तसेच स्नानगृह अशी व्यवस्था तातडीने करून दिली जाणार आहे. यासाठी २५ लाख रु पये अनंत गीते यांच्या सहकार्याने उपलब्ध करून दिले जाणार आहे. किनाऱ्याच्या संपूर्ण संवर्धनासाठी सविस्तर प्रस्ताव नगरपरिषदेकडून लवकरात लवकर करून देत आहोत असे नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांनी सांगितले.