शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

"त्याला मराठ्यांचा नेता मानत नाही, मोदी महाराष्ट्रात येतील तेव्हा...", नारायण राणेंचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 12:50 IST

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. १० तारखेला सुरु झालेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यात राज्यात सध्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी आणि राज्यसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटलांवर बोचरी टीका केली आहे. जरांगेंनी मोदींना राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिल्यानंतर राणे संतापले.

नारायण राणेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामुळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठ्यांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. पंतप्रधान जेव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव. तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत. 

जालनाच्या अंतरवाली सराटी इथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती ढासळताना पाहून उपस्थित ग्रामस्थ, महिला आणि लहान मुलांनीही त्यांना निदान पाणी तरी प्या अशी गळ घातली. जरांगे-पाटील यांनी उपचार घेण्यासही नकार दिला. त्यांनी किमान पाणी तरी प्यावे, यासाठी महिलांसह ग्रामस्थांनीही विनवणी केली. परंतु, जरांगे त्यांनाही नकार देत आहेत. विशेष म्हणजे, उपोषण स्थळाशेजारी राहणारी दीड वर्षीय काव्या या चिमुकलीनेही एक तास जरांगे-पाटील यांच्याजवळ बसून मनोजमामा, पाणी घ्या अशी विनवणी केली. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अतिशय खालावल्याने राज्यातील मराठा समाज चिंतेत आहे. आम्ही सर्वच नाही तर संपूर्ण समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे व आपल्या विषयी समाजाच्या मनात कसली ही शंका नाही. यात चिंतेतून समाजातील विविध संघटनांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. आपणा शिवाय आम्हास कुणी वाली नाही, आरक्षणाची लढाई सुरूच राहील, आपण औषधोपचार घ्यावेत असे आवाहन मराठा मेडीकोज, महाराष्ट्र राज्यने पत्राद्वारे  केले आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणेNarendra Modiनरेंद्र मोदीManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण