शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

कोल्हापूर दौरा, अचानक समोर तालमीतला मित्र दिसला, मोहोळांनी गाडी थांबवून गळाभेट घेतली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 12:31 IST

Murlidhar Mohol : काल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ कोल्हापूर दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना रस्त्यातच त्यांचा तालमीतील जुना मित्र भेटला .

Murlidhar Mohol ( Marathi News ) : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ काल कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना त्यांच्याच बंदोबस्तात तालमीतील एक जुना मित्र भेटला. मोहोळ यांचा जुना मित्र कोल्हापूर पोलीस तलामध्ये कर्तव्यास आहे, बंदोबस्तामध्ये त्यांना पाहताच मुरलीधर मोहोळ यांनी  चालकाला सांगून ताफा थांबवायला सांगितला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी

या भेटीबाबतचा व्हिडीओ मुरलीधर मोहोळ यांच्या सोशल मिडिया प्लॅफॉर्म एक्सवरही शेअर केला आहे. या पोस्टमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे की, 'संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात गेलो असता माझ्या सुरक्षेसाठी लावलेल्या पोलिसांच्या सुरक्षा बंदोबस्तात कोल्हापूर पोलीस दलात काम करणारा माझा कोल्हापूरच्या तालमीतील मित्र श्री. शहाजी पाटील अचानक समोर आला. शहाजी दिसताच ताफा थांबवत त्याची भेट घेतली आणि संवाद साधला'.

'इतक्या वर्षांनी अचानकपणे झालेली ही भेट सुखद धक्का देणारी ठरली. इतकंच नाही तर त्याला पाहाताक्षणी तालमीत असतानाच्या आठवणींचा पट क्षणार्धात डोळ्यासमोर उभा राहीला', असंही मोहोळ यांनी म्हटले आहे. 

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुरलीधर मोहोळ हे काही काळ कोल्हापूरात होते. यावेळी तालीमही केली आहे. याबाबतचे किस्से त्यांनी याआधीही आपल्या भाषणातून त्यांनी सांगितले आहे.

 

महापौर ते थेट केंद्रीय मंत्री

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात नगरसेवक पदावरुन सुरुवात केली. पुढे ते सलग पाच वर्षे महापौर पदावर काम केले. यानंतर त्यांना जून २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने खासदारकीचे तिकिट दिले. 

पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे, एमआयएमचे अनिस सुंडके या चार जणांसह ३५ उमेदवार रिंगणात उभे होते. खरी लढत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यात झाली. कोथरूड, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि पर्वती या चार विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे १ लाख २३ हजार १६७ मताधिक्याने निवडून आले. सर्वत्र जल्लोष करत मोहोळ यांनी लोकसभेच्या आखाड्यात धंगेकरांना चितपट केले. भाजपाने त्यांच्यावर पहिल्याच टर्ममध्ये मंत्रि‍पदाची जबाबदारी दिली आहे.

टॅग्स :murlidhar moholमुरलीधर मोहोळkolhapurकोल्हापूरBJPभाजपा