शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अमित शाह यांच्यावर दुःखाचा डोंगर, मोठ्या बहिणीचं मुंबईत निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 16:59 IST

अमित शाह यांची मोठी बहिण राजेश्वरीबेन यांचे मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

Amit Shah Sister Died : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शाह यांची मोठी बहीण राजेश्वरीबेन शाह यांचे आज मुंबईत निधन झाले. 65 वर्षीय राजेश्वरीबेन फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. महिनाभरापूर्वीच त्यांना अहमदाबादहून मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बहिणीच्या निधनानंतर अमित शाह यांनी गुजरातमधील त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. 

अमित शाह रविवारी रात्री मुंबईत दाखल झाले होते. शाह यांनी बहिणीवर उपचार सुरू असलेल्या खासगी रुग्णालयात जाऊन बहिणीच्या तब्येतीची विचारपूस केली. शाह आणि मुख्यमंत्री शिंदे हॉस्पिटलमध्ये येताच परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. रात्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचे काही नातेवाईकही होते. शाह हे जवळपास 2 तास हॉस्पिटलमध्ये बहिणीसोबत होते. अमित शाह यांना भेटण्यासाठी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीही हजर होते. शाह यांचा खासगी दौरा असल्याने ते इतर कुणालाही न भेटता पुन्हा दिल्लीला रवाना झाले. आज त्यांच्या बहिणीच्या निधनाची बातमी समोर आली.

एकनाथ शिंदे यांनी वाहिली श्रद्धांजली अमित शाह यांच्या बहिणीच्या निधनाची माहिती मिळताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला आहे. राजेश्वरीबेन यांचे जाणे हा संपूर्ण शाह कुटुंबीयांना मोठा धक्का असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, मी वैयक्तिकरित्या या दु:खात सहभागी आहे आणि अमितभाई आणि संपूर्ण शहा कुटुंबीयांना हा धक्का सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहMumbaiमुंबईWomenमहिलाDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल