शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
4
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
5
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
6
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO
7
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
8
तीन सरकारी बस एकमेकांवर धडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
9
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
10
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
11
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
12
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
13
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
14
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
15
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
16
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
17
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
18
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
19
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
20
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरेंचा डोळा उद्या पंतप्रधानपदावर असेल, आम्ही काय करावं, हे त्यांनी सांगू नये”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 15:24 IST

Maharashtra Political Crisis: बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. कुठे बाळासाहेब आणि उद्धव कुठे, अशी खोचक टीका केंद्रातील भाजप नेत्याने केली आहे.

मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठेच भगदाड पडले आहे. पक्ष वाचवण्याचे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर असल्याचे सांगितले जात आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही आता कंबर कसली आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. यानंतर आता भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

उद्धव ठाकरेंना आरोप करायचे असतील, तर लोकांसमोर जावं, जाहीर भाषण करून करावेत. संजय राऊतांना मुलाखत द्यायची असेल एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची घेतली पाहिजे. बंद खोलीत मुलाखत घेतात आणि काहीही बेछूट आरोप करतात. हे आरोप बिनबुडाचे आहेत. शिवसेनेने भाजपाशी जो दगाफटका केला त्यातून सावरण्यासाठी अशाप्रकारे आरोप केले जात आहेत, असा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी लगावला आहे. 

पंतप्रधानपदावर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे

पंतप्रधानपदावर उद्धव ठाकरेंचा डोळा आहे. हेच म्हणत होते पंतप्रधान उद्धव ठाकरे बनतील. उद्धव ठाकरे काय बोलतात त्यावर भाजप चालत नाही. उद्धव ठाकरे निराश झाले आहेत. ते आज काय बोलतात, हे उद्या त्यांच्या लक्षात राहत नाही. आम्ही काय करावं, कुठला निर्णय घ्यावा ते आम्हाला सांगू नये. तुम्ही दोघं कोण हे सगळ्या राज्याला माहिती आहे. मुलाखत फडणवीस-राज आणि शिंदेंची या सगळ्यांची घ्यावी आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरेंना विचारावी असंही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही 

एकनाथ शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसला म्हणतात मग २०१९ ला उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला ते दिसलं नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन असं वचन दिलं सांगता पण स्वत:चा सार्थ साधत दिलेला शब्द पाळला नाही. सध्या उद्धव ठाकरे नैराश्य झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलनाच होऊ शकत नाही. बाळासाहेब कुठे आणि उद्धव कुठे असाही खोचक टीका दानवेंनी केली. 

दरम्यान, ‘सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही; पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले.  काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती. त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. मला चिंता आहे ती मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळraosaheb danveरावसाहेब दानवेUddhav Thackerayउद्धव ठाकरे