शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दोन आयाराम अन् एक निष्ठावान; मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यातील 'या' दिग्गजांना मिळणार स्थान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 12:29 IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार; राज्यातील तीन नावं चर्चेत

नवी दिल्ली: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मोदी सरकारकडून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. त्यासाठी अनेक बड्या नेत्यांची नावं चर्चेत आहेत. केंद्रात जवळपास ८० मंत्रालयं आहेत. सध्याच्या घडीला ६० मंत्र्यांकडे या मंत्रालयांचा कार्यभार आहे. अनेक वरिष्ठ मंत्र्यांकडे अतिरिक्त पदभार आहे. शिवसेना, शिरोमणी अकाली दलानं भाजपची साथ सोडल्यानं त्यांना देण्यात आलेली मंत्रिपदं रिक्त आहेत. त्यामुळे भाजपमधील अनेकांना दिल्लीत संधी मिळू शकते.

मोदी सरकार-२ ला २ वर्ष पूर्ण झाली आहेत. या २ वर्षात एकदाही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पावसाळी अधिवेशनाआधी होणाऱ्या विस्तारात महाराष्ट्रातील तिघांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. यातील दोन नावं राज्यसभेतील असून ते इतर पक्षातून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसलेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. त्यांच्यासोबत शिवसेना, काँग्रेस असा प्रवास केलेल्या नारायण राणेंच्या नावाचीही चर्चा आहे. राणे सध्या दिल्लीत असल्यानं त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांचं नावदेखील केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. शिवसेनेवर बरसणाऱ्या राणेंना पंतप्रधान मोदींकडून स्पेशल गिफ्ट? दिल्ली भेटीनं चर्चांना उधाण

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यापासून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून टोलवाटोलवी सुरू आहे. नारायण राणे सातत्यानं ठाकरे सरकारवर शाब्दिक प्रहार करत आहेत. यासोबतच पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपनं आतापासूनच सर्व ताकद पणाला लावली आहे. राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यास त्याचा फायदा भाजपला महापालिका निवडणुकीत होऊ शकतो.

भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उदयनराजे भोसलेंनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे २०१९ मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसातील सभेनं ही निवडणूक गाजली. या निवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला. त्यानंतर भाजपनं त्यांना राज्यसभेवर संधी दिली. 

प्रितम मुंडे या भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर त्यांनी लोकसभेची पोटनिवडणूक लढवली. त्या दोनवेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहेत. ओबीसी मतदारांमध्ये चांगला संदेश जाण्यासाठी त्यांना संधी दिली जाऊ शकते.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेPritam Mundeप्रीतम मुंडेNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी