बिनविरोधचा मार्ग बंद
By Admin | Updated: September 16, 2014 00:35 IST2014-09-16T00:35:51+5:302014-09-16T00:35:51+5:30
पंजाबमधील घुमान येथे होणा:या 88व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी पुण्यात अर्ज दाखल केला,

बिनविरोधचा मार्ग बंद
घुमान साहित्य संमेलन : अध्यक्षपदासाठी सदानंद मोरे, अशोक कामत यांचा अर्ज दाखल
पुणो/कोल्हापूर : पंजाबमधील घुमान येथे होणा:या 88व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी पुण्यात अर्ज दाखल केला, तर डॉ. अशोक कामत यांनी कोल्हापूरमध्ये उमेदवारी जाहीर केली.
पुण्यात मोरे यांनी अर्ज दाखल केला, त्या वेळी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते.
साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस हे सूचक, तर कवी उद्धव कानडे, निकिता मोघे, शिरीष चिटणीस, सासवड शाखेचे विजय कोलते
आणि प्रकाशक परिषदेचे
कार्याध्यक्ष अरुण जाखडे अनुमोदक आहेत. ‘‘आपली सांस्कृतिक
परंपरा आणि त्यांचे असलेले नाते शोधण्याचा प्रय} करणार आहे. घुमानमध्ये मराठी भाषेचा प्रसार करण्याची संधी परत एकदा मिळाली आहे,’’ अशा भावनाही मोरे यांनी व्यक्त केल्या.
सांस्कृतिक निवडणुका या राजकारणातील निवडणुकांप्रमाणो नसाव्यात त्यासाठी डॉ. मोरे यांना पा¨ठबा दिल्याचे सबनीस म्हणाले.
‘‘मी मराठी आणि शीख संत साहित्याशी संबंधित आहे. संत नामदेवांच्या अध्यासनाचे काम गेली 22 वर्षे करीत असून, घुमान ही नामदेवांची कर्मभूमी असल्याने पदासाठी इच्छुक आहे,’’ असे कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत उमेदवारी जाहीर करताना डॉ. अशोक कामत यांनी सांगितले.
माङो 5क् वर्षातील सारे कार्यानुभव संमेलनात मांडून मायमराठीची बलस्थाने सर्वासमोर ठेवायची आहेत. नाथसंप्रदाय आणि संत नामदेवविषयक अभ्यास साक्षेपाने मांडायचा आहे, असे कामत म्हणाले.
(प्रतिनिधी)
4महाराष्ट्राबाहेर साहित्य संमेलन होत असल्याने महाराष्ट्र प्रकाशक परिषदेने साहित्य महामंडळाविरुद्ध नाराजी व्यक्त केली होती. साहित्य संमेलन राज्यात घेऊन उपसंमेलन घुमानला घ्यावे, अशी भूमिका अरुण जाखडे यांनी जाहीर केली होती. मात्र, डॉ. मोरे यांनी दाखल केलेल्या अर्जावर अनुमोदक म्हणून जाखडे यांनी स्वाक्षरी केली आहे. याविषयी विचारले असता जाखडे म्हणाले,‘‘प्रकाशक परिषदेचा नव्हे, तर माझा डॉ. मोरे यांना वैयक्तिक पा¨ठबा आहे. अनेक वर्षापासून आमची ओळख आहे; त्यामुळे अनुमोदक म्हणून मी स्वाक्षरी केली आहे. प्रकाशक परिषद आणि साहित्य महामंडळातील वादावर तोडगा काढण्यासाठी वात्रटिकाकार रामदास फुटाणो प्रय}शील आहेत. त्यातून काही तरी मार्ग निघेल, अशी अपेक्षा आहे.’’
निवडणूक
बिनविरोध व्हावी
साहित्य संमेलनाची निवडणूक ही बिनविरोध व्हावी असे वाटते; परंतु आता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढच्या संमेलनासाठी संमेलनाध्यक्षांची निवड बिनविरोध करण्यासाठी यंत्रणा विकसित करता येईल.
- डॉ. सदानंद मोरे
माघार नाही.
सदानंद मोरे यांच्याशी माङो अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. संमेलनाध्यक्षपद निवडणुकीतूनच निवडले जाते. मी कुणाच्या विरोधात नाही, तर त्यांच्या बरोबरीने निवडणुकीसाठी उभा आहे. माघार घेण्याचा प्रश्नच नाही.
- डॉ. अशोक कामत