पुण्यातील मेडिकल्सचा बेमुदत बंद, रुग्णांचे हाल

By Admin | Updated: June 26, 2014 18:47 IST2014-06-26T18:08:03+5:302014-06-26T18:47:01+5:30

अन्न व औषध विभागाच्या कारवाईच्या निषेधार्थ पुण्यातील मेडिकल स्टोअर्सनी बेमुदत पुकारला असून जिल्ह्यातील तब्बल सात हजार मेडिकल्स बंदमध्ये सामिल आहेत.

The unhealthy closure of the medicines in Pune, the condition of the patients | पुण्यातील मेडिकल्सचा बेमुदत बंद, रुग्णांचे हाल

पुण्यातील मेडिकल्सचा बेमुदत बंद, रुग्णांचे हाल

 ऑनलाइन टीम

पुणे, दि. २६ - अन्न व औषध विभागाच्या (फूड अँड ड्रग्ज असोसिएशन)  कारवाईच्या निषेधार्थ पुण्यातील मेडिकल स्टोअर्सनी बेमुदत पुकारला असून जिल्ह्यातील तब्बल सात हजार मेडिकल्स बंदमध्ये सामिल आहेत. आज सकाळी मेडिकल स्टोअर्स असोसिएशनतर्फे 
अन्न व औषध विभागाच्या कारवाईविरोधात घोषणा देत जोरदार निदर्शने करण्यात आली. अखेर आज संध्याकाळपासून सर्व मेडिकल स्टोअर्सच्या मालकांनी बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे. मात्र याचा फटका पुण्यातील रुग्णांना बसला असून त्यांचे अतोनात हाल होत आहेत.

Web Title: The unhealthy closure of the medicines in Pune, the condition of the patients