दुर्दैवी! सिलिंडर डोक्यात पडून 7 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

By Admin | Updated: April 19, 2017 21:03 IST2017-04-19T21:03:07+5:302017-04-19T21:03:07+5:30

मुंबईच्या धारावीमध्ये सिलिंडर डोक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना

Unfortunate! Dying on the cylinder's head, the 7-year-old's pinch of death takes place on the spot | दुर्दैवी! सिलिंडर डोक्यात पडून 7 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

दुर्दैवी! सिलिंडर डोक्यात पडून 7 वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - सिलिंडर डोक्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईच्या धारावीमध्ये ही घटना घडली. यामध्ये 7 वर्षांच्या मोहम्मद बिलाल शेख याचा मृत्यू झाला. तो इयत्ता पहिलीत शिकत होता.  
 
दुपारच्या वेळी फार उकाडा जाणवत असल्याने  हा चिमुकला आपल्या घराच्या दरवाजात झोपला होता. घरात पंखा नसल्यामुळे दारात झोपल्याने थोडीफार हवा लागेल असा विचार करून तो धारावी पोलीस स्थानकाच्या समोर असलेल्या धोरवाडा झोपडपट्टीतील आपल्या घराच्या दरवाजात झोपला.  त्यावेळी त्याच्या वरच्या मजल्यावर राहणा-यांच्या घरी सिलिंडर पोहोचवण्यासाठी एक व्यक्ती शिडी चढून येत होता.
 
अचानक त्याचा पाय घसरला आणि त्याच्या हातातील सिलेंडर झोपलेल्या चिमुकल्याच्या डोक्यात पडलं व त्या लहानग्याचा जागीच मृत्यू झाला.     

Web Title: Unfortunate! Dying on the cylinder's head, the 7-year-old's pinch of death takes place on the spot