मुलीच्या बारशासाठी घरी येणा-या पित्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

By Admin | Updated: May 13, 2016 13:20 IST2016-05-13T13:17:11+5:302016-05-13T13:20:45+5:30

मुलीच्या बारशासाठी मुंबईहून गावी जाणा-या पित्याचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील धामणीजवळ घडली

Unfortunate death in the father's accident at the home of the girl's barsha | मुलीच्या बारशासाठी घरी येणा-या पित्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

मुलीच्या बारशासाठी घरी येणा-या पित्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

ऑनलाइन लोकमत
आरवली, दि. १३ -  मुलीच्या बारशासाठी मुंबईहून गावी जाणा-या पित्याचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील धामणीजवळ घडली. विनोद मारूती गमरे असे मृत व्यक्तीचे नाव असून रेल्वे स्थानकाकडून घराकडे जाताना कार व रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात त्याला जीव गमवावा लागला. दरम्यान या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास अपघाताची ही दुर्दैवी घटना घडली. दोन्ही गंभीर जखमींना डेरवणमधील वालावलकर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईमध्ये राहणारे विनोद गमरे हे आपल्या मुलीच्या बारशासाठी आज शुक्रवारी पहाटे रेल्वेने संगमेश्वर रोड रेल्वेस्थानकावर उतरले. तेथून ते रिक्षाने (एमएच 08- के 1439) आपल्या गावी धामणी बौद्धवाडी येथे जाण्यासाठी निघाले. मात्र वाटेत एक होंडा कार (एमएच 20- क्यू 0090) त्यांच्या रिक्षाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात रिक्षा पूर्णपणे चेपली गेली आहे. त्यामुळे रिक्षातील गमरे जागीत ठार झाले. रिक्षाचालक लीलाधर पंडित (चिखली. ता. संगमेश्वर) आणि कारचालक चमनलाल राजकुमार मित्तल (दिल्ली) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना डेरवण रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
 

 

Web Title: Unfortunate death in the father's accident at the home of the girl's barsha