शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अंडरवर्ल्ड ‘डॉन’ने विचारले, ‘तू डी गँग से सुपारी लेकर तो नहीं आया...?’ डी कंपनीच्या शाकिरसोबत डॉनची भेट

By नरेश डोंगरे | Updated: April 17, 2023 08:01 IST

Nagpur: मायानगरी मुंबई आणि अंडरवर्ल्डमध्ये ज्याची कधीकाळी प्रचंड दहशत होती, त्या अंडरवर्ल्ड डॉनचा बीपी एका परप्रांतीय गुन्हेगाराने चांगलाच वाढवला होता.

- नरेश डोंगरे नागपूर : मायानगरी मुंबई आणि अंडरवर्ल्डमध्ये ज्याची कधीकाळी प्रचंड दहशत होती, त्या अंडरवर्ल्ड डॉनचा बीपी एका परप्रांतीय गुन्हेगाराने चांगलाच वाढवला होता. कट्टर शत्रू डी गँगशी हा गुन्हेगार संबंधित असल्याने तो आपली सुपारी घेऊनच कारागृहात आला असावा, असा संशय ‘डॉन’ला आला. तो कारागृहातून बाहेर जाईपर्यंत ‘डॉन’ कमालीचा अस्वस्थ होता.

कर्नाटकातील कुख्यात गुन्हेगार जयेश कांथा ऊर्फ शाकिर याचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (डी कंपनी) तसेच दहशतवादी अफसर पाशाशी संबंध असल्याची चर्चा आहे. शाकिरने (जयेश) बंगळुरू कारागृहात असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून १०० कोटींची खंडणी मागून धमकीही दिली.

पोलिसांनी त्याला अटक करून नागपुरात आणले. तो कारागृहात पोहोचण्यापूर्वीच त्याची संपूर्ण कुंडली  अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याला माहीत झाली होती. जयेश ऊर्फ शाकिर लष्कर-ए-तोयबा आणि पीएफआयसोबतच डी कंपनीसाठीही काम करतो, हे कळाल्याने डॉन अस्वस्थ झाला होता. त्यामुळे डॉनने आपल्या साथीदारांच्या मदतीने स्वत:ला अंडरकव्हर करून घेतले.

जेल कॅन्टीनमध्ये शहानिशाखास सूत्रांच्या माहितीनुसार, शाकिर कारागृहात पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ‘डॉन’ने जेल कॅन्टीनमध्ये शाकिरला गाठले. ‘तू डी कंपनी का आदमी है. मेरी सुपारी लेकर अंदर आया क्या’ अशी थेट विचारणा केली. शाकिरने नाही म्हटल्यानंतर डॉनचे काहीसे समाधान झाले. त्यानंतर डॉनने शाकिरला ज्यूस आणि सिगारेट पाजल्याचीही माहिती आहे. शाकिर कारागृहातून बाहेर गेल्यानंतर ‘डॉन’ची अस्वस्थता संपल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र