आरोग्य विभागाचा घोटाळा समजून घेण्यासाठी बघा हा व्हिडियो
By Admin | Updated: April 16, 2016 15:00 IST2016-04-16T12:25:16+5:302016-04-16T15:00:35+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या मनमानी खरेदीचा भांडाफोड लोकमतने केल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा विषय गाजवला

आरोग्य विभागाचा घोटाळा समजून घेण्यासाठी बघा हा व्हिडियो
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या मनमानी खरेदीचा भांडाफोड लोकमतने केल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा विषय गाजवला. या खरेदी प्रकरणाची एसीबी मार्फत चौकशी करा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली, तर ठराविक ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून खरेदी झाल्याचा आरोप विधानसभेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
हा भांडाभोड करणारे लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी उलगडून सांगताहेत नक्की काय आहे हा घोटाळा?
त्यानंतर...
- सभागृहात चर्चा सुरु होण्याआधीच आरोग्य मंत्र्यांनी दोन उपसंचालक निलंबित करण्याची घोषणा केली.
- कोणतीही चौकशी न करता आपण हे निलंबन तडकाफडकी केले, याचाच अर्थ आपल्याला छापून आलेला सगळा घोटाळा मान्य आहे असा होतो असा आरोप मुंडेंनी केला.
- आपण दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली, पण आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांची काहीच जबाबदारी नाही का असा सवाल उपस्थित झाला.
- विधानसभेत विरोधीपक्ष नेते विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर टीका केली. गोरगरिबांना उपचार द्यायचे सोडून त्यांच्या उपचारासाठीचे पैसे हडप करण्यासारखे पाप नाही, असे सांगून विखे पाटील यांनी या खरेदी घोटाळ्याचे धागेदोरे सभागृहात मांडले.
- तर जयंत पाटील यांनी ही खरेदीच कागदोपत्री झाल्याचा गंभीर आरोप केला.
- मीरा भार्इंदर, अकोला, भिवंडी सारख्या शहरांना पुरवठा करायचा आणि पैसे लाटायचे हे एक मोठे रॅकेट आहे , असे सांगून पाटील यांनी दुय्यम दर्जाची औषधे माथी मारण्याच्या प्रकरणावरुन सरकारवर कठोर टीका केली.