शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर अंडरपासचा उतारा

By admin | Published: September 27, 2016 7:51 PM

मएसआरडीसीच्या माध्यमातून अंडरपास करण्याची सूचना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 27 - कल्याण-शीळ मार्गावर काटई नाक्याजवळ लोढा पलावा येथे क्रॉसिंगमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून या ठिकाणी एमएसआरडीसीच्या माध्यमातून अंडरपास करण्याची सूचना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली असून सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक वाहतूक) मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला तत्वतः मंजुरी देत याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश एमएसआरडीसीला दिले आहेत.कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या संदर्भात खा. डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने मंगळवारी पालकमंत्री श्री शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, कल्याण-डोंबिवलीचे महापौर राजेंद्र देवळेकर, उल्हासनगरचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर, अंबरनाथ नगर परिषद, एम आय डी सी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.विविध प्रकल्पांसंदर्भात याप्रसंगी चर्चा झाली.तसेच कमी खर्चात आणि जलद वेळेत हे प्रकल्प होण्यासाठी शीट पायलिंग पद्धतीचा वापर करण्याबाबत एक सादरीकरण या प्रसंगी करण्यात आले. उल्हासनगरमधील खेमाणी नाल्याचे नदीत मिसळणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या एसटीपी मधील पाणी नंतर नदीत सोडण्यासाठी शीट पायलिंग पद्धतीचा वापर करण्याबाबत, तसेच उल्हास नगर मधील डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपल्यामुळे कचऱ्याचे ढीग कधीही कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन शीट पायलिंग पद्धतीने या ढिगाऱ्याभोवती संरक्षक भिंत बंधण्याबाबत चर्चा करण्यात आली. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील नाल्यांचे मजबुतीकरण देखील याच पद्धतीने करण्याची सूचना याप्रसंगी खा. डॉ. शिंदे यांनी केली.शिळ-कल्याण रस्त्यावर एम एस आर डी सी च्या माध्यमातून उन्नत मार्ग बांधला जाणार असाल तरी तोपर्यंत या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी केली. तसेच, काटई नाक्याजवळ लोढा येथे क्रॉसिंगमुळे होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन तिथे अंडरपास करण्याची मागणीही त्यांनी केली. शीट पायलिंग पद्धतीने हे काम कमी खर्चात आणि वर्षभरात होणार असल्यामुळे याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री शिंदे यांनी दिले. कल्याण येथील खाडी किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणाबाबतही चर्चा झाली. कल्याणला लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनाऱ्याचा विकास करण्यासंदर्भात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री शिंदे यांनी महापालिकेला दिले.