खांदेश्वर स्थानकातील भुयारी मार्ग पाण्यात
By Admin | Updated: July 20, 2016 02:52 IST2016-07-20T02:52:56+5:302016-07-20T02:52:56+5:30
मुंबई शहरासह उपनगरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावले.

खांदेश्वर स्थानकातील भुयारी मार्ग पाण्यात
तळोजा : मुंबई शहरासह उपनगरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावले. पावसामुळे नोकरदार व शालेय विद्यार्थ्यांची धांदल उडाली. महामार्ग तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला फटका बसला. खांदेश्वर, मानसरोवर रेल्वे स्थानकातील सबवेमध्ये पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले.
सायन-पनवेल महामार्गावर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. खांदेश्वर रेल्वे स्थानकात मुख्य प्रवेशद्वारात पाणी साचल्याने गाडी पकडण्यासाठी धावपळ करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. सबवेमधील पाणी काढण्यासाठी याठिकाणी पंप बसविण्यात आले आहेत. मात्र ते बंद असल्याने सबवे पाण्याखाली गेला. पर्यायी मार्ग नसल्याने खांदा वसाहत, कामोठे, कळंबोली, पनवेल येथून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.