वसई किल्ल्यात भुयारी मार्गभ्रमंती
By Admin | Updated: March 4, 2017 03:30 IST2017-03-04T03:30:32+5:302017-03-04T03:30:32+5:30
आमची वसई युवा समूहातर्फे इतिहास प्रेमींसाठी रोमांचक व विनामुल्य वसई दुर्ग व भुयारी मार्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे.

वसई किल्ल्यात भुयारी मार्गभ्रमंती
वसई : आमची वसई युवा समूहातर्फे इतिहास प्रेमींसाठी रोमांचक व विनामुल्य वसई दुर्ग व भुयारी मार्ग भ्रमंतीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ५ मार्च २०१७ रोजी सकाळी ठीक ८ वाजता आमची वसई युवा समूहातर्फे वसई दुर्ग व भुयारी मार्ग भ्रमंती आयोजित करण्यात आली आहे.
वसई किल्ल्यात ५५३ फूट लांबीचा भुयारी मार्ग आहे. भुयार पार करायला अंदाजे २० मिनिटांचा अवधी लागतो. तटावरून भुयारात हवा खेळती रहावी म्हणून झडपा आहेत. या भुयारातून आरपार प्रवेश करणे अवघड आहे. कारण मध्ये फारच अंधार असून ते गाळाने भरल्यामुळे वाकून व मधेच सरपटत जावे लागते. हा थरारक अनुभव घेण्यासाठी रविवारी सकाळी आठ वाजता वसई किल्ल््यात पोचायचे आहे. यात सहभाही होणाऱ्यांसाठी आयोजकांनी खास सूचना केल्या आहेत. किल्ल््यात जेवण्यासाठी उपहारगृह नसल्यामुळे अल्पोपहारासाठी डबा , पाण्याची बाटली आणावी. भुयारात एकट्याने प्रवेश करणे टाळावा. प्रत्येकाने बरोबर (विजारी) बॅटरी आणावी . वाकून जाताना स्वत:चे डोके सांभाळावे. भुयारात अजिबात आरडा ओरडा करू नये . शांतता राखावी. रक्तदाब, हृद्यविकार व दमा असलेल्यांनी भुयारात प्रवेश टाळावा. भुयारी मार्ग पार केल्यावर पुढे दुर्ग भ्रमंती सुरु होणार आहे. तर दुर्ग भ्रमंतीची सांगता दुपारी ४ वाजता होणार आहे, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)