‘महानंद’ माहितीच्या अधिकाराखाली

By Admin | Updated: August 7, 2014 01:40 IST2014-08-07T01:40:42+5:302014-08-07T01:40:42+5:30

महानंद संस्था माहिती अधिकाराच्या कक्षेत येत असून, या संस्थेने महिनाभरात जन माहिती अधिकारी आणि अपिलीय माहिती अधिकारी नेमावेत, असे आदेश या संस्थेला देण्यात आले आहेत.

Under 'Right to Information' Mahanand | ‘महानंद’ माहितीच्या अधिकाराखाली

‘महानंद’ माहितीच्या अधिकाराखाली

>मुंबई : महानंद संस्था माहिती अधिकाराच्या कक्षेत येत असून, या संस्थेने महिनाभरात जन माहिती अधिकारी आणि अपिलीय माहिती अधिकारी नेमावेत, असे आदेश या संस्थेला देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक महासंघ म्हणजेच महानंदला माहितीचा अधिकार लागू करण्यात आला आहे, असे मुंबईच्या विभागीय माहिती आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकारात महानंदच्या कार्यपद्धतीची माहिती उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र दूध वितरक व वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष नाईक यांनी माहितीच्या अधिकारात या संस्थेची माहिती मागवली होती. यावर महानंदने जुजबी माहिती दिली. शिवाय अधिक माहिती देण्यास नकार दिला होता.
 नाईक यांनी याबाबत मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर गायकवाड यांनी महानंदला माहितीचा अधिकार लागू होत असल्याचा निर्णय दिला. महानंदने मात्र मुख्य आयुक्तांच्या या निर्णयाला आक्षेप घेतला. आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने मुख्य माहिती आयुक्त गायकवाड यांचा निर्णय रद्दबातल ठरविला. शिवाय यासंदर्भात मुख्य आयुक्तांना पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले. मुंबई विभागाचे माहिती आयुक्त ए. के. जैन यांच्या नेतृत्वाखाली मागील दोन महिने यावर सुनावणी झाली. त्यानंतर दोन्ही बाजू सविस्तर ऐकून महानंदला माहितीचा अधिकार लागू होतो, असा निर्णय देण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Under 'Right to Information' Mahanand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.