सैन्य भरतीच्या नावाखाली ३५ लाखांचा गंडा

By Admin | Updated: October 14, 2015 04:14 IST2015-10-14T04:14:07+5:302015-10-14T04:14:07+5:30

सैन्यदलात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सात जणांना प्रत्येकी पाच लाखांप्रमाणे ३५ लाखांचा गंडा घालणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Under the name of army recruitment, Rs. 35 lakhs | सैन्य भरतीच्या नावाखाली ३५ लाखांचा गंडा

सैन्य भरतीच्या नावाखाली ३५ लाखांचा गंडा

औरंगाबाद : सैन्यदलात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सात जणांना प्रत्येकी पाच लाखांप्रमाणे ३५ लाखांचा गंडा घालणाऱ्या तीन आरोपींविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींपैकी मन्सूर अली हा सैन्यदलात नोकरीस आहे. या पार्श्वभूमीवर सैन्यदलात भरतीचे आमिष दाखवून गंडा घालणारे रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
मन्सूर अली (रा. पुणे) याच्यासह शेख अय्युब शेख महेबूब (रा. डोंबरी, ता. जि. बीड) आणि मालन महेबूब शेख (रा. बीड) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. सैन्य भरतीच्या नावाखाली फसवणूक झालेले सर्व युवक अंतरवली (ता. पैठण) येथील रहिवासी आहेत. योगेश्वर हंडे, सोपान हंडे, योगेश ताठे, राजू दवंगे, नकुल निवारे, महेस भोगे आणि योगेश शिरसाठ यांचा फसवणूक झालेल्यांत समावेश आहे.
असे फुटले बिंग
शेख अय्युब व मन्सूर अली यांनी सात युवकांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे ३५ लाख रुपये घेतले. या युवकांना नगर, औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणचे नियुक्ती आदेश दिले. अंतरवली गावातील काही जण सैन्य दलात नोकरीस आहेत. कसलीही परीक्षा, शारीरिक चाचणी न घेता, आपली सैन्यदलात नियुक्ती झाल्याची माहिती या युवकांनी त्यांना दिली. नियुक्ती आदेशही त्यांना दाखविले, तेव्हा हे आदेश बनावट असल्याचे त्यांनी सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पैसे परत करण्याची मागणी युवकांनी केली असता, शेख अय्युब व मन्सूर अली यांनी त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. या युवकांनी अखेर सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणूक झाल्याची तक्रार दिली.

Web Title: Under the name of army recruitment, Rs. 35 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.