शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थिती नियंत्रणामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2019 06:00 IST

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली असून एनडीआरएफच्या ४ बोटींसह २१ जवान कोल्हापुरात परत गेले आहेत.

कोल्हापूर/सांगली : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात आली असून एनडीआरएफच्या ४ बोटींसह २१ जवान कोल्हापुरात परत गेले आहेत. पूर ओसरल्यानंतर स्वच्छता आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी मुंबई महापालिका, नवी मुंबई महापालिकेसह अन्य शहरांमधून यंत्रणा दोन्ही जिल्ह्यांच्या मदतीसाठी धावली आहे. पंचगंगेची पातळी धोक्याच्या इशारा पातळीवरून खाली आली आहे.मुंबई महापालिकेसह काही कंपन्यांनी चिखलपाणी काढण्यासाठीची यंत्रे पाठवून दिली आहेत. बुधवारी दुपारी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी जिल्हा परिषदेत पूरस्थिती आणि नंतरचे पुनर्वसन याबाबत सविस्तर आढावा बैठक घेतली.आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे सलग आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून असून त्यांनी इतर जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणाही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत कामाला लावली आहे. दिवसभरामध्ये पशुसंवर्धन विभागाने २५0 हून अधिक छोटी, मोठी जनावरे शास्त्रीयदृष्ट्या जमिनीमध्ये पुरली.सांगलीचा महापूर गतीने ओसरत असून, बुधवारी येथील कृष्णा नदीची पाणी पातळी ३८ फुटांवर म्हणजेच इशारा पातळीखाली आली होती. जलसंपदा विभागाच्या अंदाजानुसार गुरुवारी यात आणखी पाच फुटाने घट होण्याची शक्यता असल्याने, आज, स्वातंत्र्यदिनी सांगली पूरमुक्त होणार आहे.कोयना धरणातून ३४ हजार ६५७ आणि वारणा धरणातून ३ हजार ९८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी असून नद्यांच्या पाणी पातळीत आता वाढ होण्याची शक्यता नाही. महापूर ओसरत असल्याने पूरग्रस्त घरी परतत आहेत.दुष्काळी भागात पाणी वळवण्याचा विचारकोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीमध्ये अतिरिक्त होणारे पाणी दुष्काळी भागामध्ये वळवण्याबाबत विचार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून याबाबत संशोधन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूर