नागराज मंजुळेंची विनाकारण बदनामी- अ‍ॅड. विकास शिंदे

By Admin | Updated: May 13, 2016 19:28 IST2016-05-13T19:28:05+5:302016-05-13T19:28:05+5:30

नागराज मंजुळे आणि सुनीता मंजुळे-लष्करे यांचा पुण्यातील न्यायालयात दिनांक १० नोव्हेंबर २०१४ ला दोघांच्या सहमतीने घटस्फोट झाला

Unconsciously defame Nagraj Manjunath- Adv. Vikas Shinde | नागराज मंजुळेंची विनाकारण बदनामी- अ‍ॅड. विकास शिंदे

नागराज मंजुळेंची विनाकारण बदनामी- अ‍ॅड. विकास शिंदे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13- दोन मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले नागराज मंजुळे यांच्या वैवाहिक जीवनावरून काही उलट-सुलट चर्चा सध्या सुरू आहेत. त्यावर पुण्यातील वकील विकास शिंदे यांनी काही माहिती उघड केली आहे. नागराज मंजुळे आणि सुनीता मंजुळे-लष्करे यांचा पुण्यातील न्यायालयात दिनांक १० नोव्हेंबर २०१४ ला दोघांच्या सहमतीने घटस्फोट झाला आहे. त्यामध्ये नागराज यांनी सुनीता यांना कायमस्वरुपी पोटगी म्हणून ७ लाख रुपये दिलेले आहेत. त्यामुळे त्या दोघांचे नवरा बायकोचे नाते कायद्याने संपुष्टात आलेले आहे, अशी माहिती वकील विकास शिंदे यांनी दिली आहे. सुनिता करीत असलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही, नागराज यांना विनाकारण बदनाम करण्यात येत असल्याचेही आरोप यावेळी विकास शिंदेंनी केले आहेत.

Web Title: Unconsciously defame Nagraj Manjunath- Adv. Vikas Shinde