शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

महिना उलटूनही अकरावी प्रवेशावर अनिश्चिततेचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:58 IST

विद्यार्थी, पालक चिंंतेत; यंदाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमासह बारावीच्या वर्षावर प्रश्नचिन्ह कायम

मुंबई : राज्य सरकारकडून मराठा आरक्षणावर कोणताही निर्णय होईपर्यंत किंवा त्यासंबंधित मार्गदर्शक सूचना येईपर्यंत संपूर्ण राज्यातील अकरावी आणि इतर प्रवेशप्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया थांबवून आज एक महिना होत आला, तरी अद्याप राज्य सरकारने कोणत्याही मार्गदर्शक सूचना किंवा निर्णय न दिल्याने विद्यार्थ्यांचे यंदाचे अकरावीचे व पुढील बारावीचे वर्षच धोक्यात आल्याची चिंता पालक, विद्यार्थ्यांना सतावत आहे.मागील महिन्यात १० तारखेला जाहीर होणारी अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. मराठा आरक्षणामुळे थांबलेल्या सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी एसईबीसी कोट्यातील प्रवेश इडब्ल्यूएस कोट्यातून करण्याचा निर्णय सुरुवातीला देण्यात आला होता. मात्र, त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांतील जागांवर परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली गेल्याने त्यालाही स्थगिती मिळाली. वर्षाच्या सुरुवातीचे ६ महिने उलटूनही प्रवेश न झाल्याने या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम करायचा कधी? तो पूर्ण कसा करायचा? त्यावर आधारित पुढील महत्त्वाचे असलेल्या बारावीच्या वर्षाचे काय? असे अनेक प्रश्न केवळ विद्यार्थी पालकांपुढे नाही, तर शिक्षक आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यापुढेही उभे राहिले आहेत.राज्यात अकरावी प्रवेशाच्या तब्ब्ल ५ लाखांहून अधिक जागा आहेत. त्यातील ३५ हजार ९०० जागा मराठा (एसईबीसी), तर ३२ हजार ५०० जागा आर्थिक दुर्बल (इडब्ल्यूएस ) घटकांसाठी आहेत. मात्र, मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत, अकरावी प्रवेशाची सर्व प्रक्रिया खोळंबली आहे. प्रवेश प्रक्रिया नव्याने होणार की पहिल्या फेरीतील प्रवेश जैसे थे राहणार, दुसऱ्या फेरीपासून प्रवेश प्रक्रियेत बदल होईल का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित असून, यावर लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थी, पालकांकडून होत आहे.निर्णयाची प्रतीक्षा : अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सरकारकडून मार्गदर्शक सूचना मागविल्या आहेत. सरकारच्या निर्णयानुसारच त्या अंमलबजावणी प्रक्रियेत समाविष्ट करून प्रवेश प्रक्रिया राबवणे शक्य होईल.- दिनकर पाटील, संचालक, शिक्षण संचालनालय

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण