खारघरच्या हॉटेलमधील अनधिकृत भिंत हटवली
By Admin | Updated: March 3, 2017 02:36 IST2017-03-03T02:36:53+5:302017-03-03T02:36:53+5:30
महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला आहे.

खारघरच्या हॉटेलमधील अनधिकृत भिंत हटवली
पनवेल : महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला आहे. खारघरमधील एका हॉटेलमध्ये नियमांचे उल्लंघन करून बांधलेली भिंत गुरुवारी महापालिकेच्या अतिक्र मण पथकाने हटविली. या वेळी पालिका आयुक्त स्वत: उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्या मालकीचे एक हॉटेल खारघरमध्ये आहे. या ठिकाणी झालेले अतिक्र मण हटविण्याची सूचना यापूर्वी महापालिकेच्या वतीने संबंधित हॉटेल प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, हॉटेलमालकाकडून सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले.
अखेर गुरुवारी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हॉटेलसाठी उभारलेली अनधिकृत भिंत पाडली. या वेळी पालिकेचे खारघर विभागीय अधिकारी श्रीराम हजारे व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)