शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

इतर मंत्र्यांकडेही अनधिकृत व्यक्ती - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 04:31 IST

केवळ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच सेवानिवृत्त अधिकारी श्रीनिवास जाधव यांना खाजगी सचिव म्हणून नेमले नसून इतर मंत्र्यांकडेही अनधिकृत व्यक्ती काम करत आहेत, गोपनिय फाईली हाताळत आहेत, असा लेखी आक्षेप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे नोंदवला आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : केवळ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच सेवानिवृत्त अधिकारी श्रीनिवास जाधव यांना खाजगी सचिव म्हणून नेमले नसून इतर मंत्र्यांकडेही अनधिकृत व्यक्ती काम करत आहेत, गोपनिय फाईली हाताळत आहेत, असा लेखी आक्षेप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे नोंदवला आहे.सामान्य प्रशासन विभागाने मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये काम करणाºया अधिकारी, कर्मचाºयांची यादी मुंडे यांना दिली असून त्यात मंत्र्यांना जेवढा स्टाफ मंजूर आहे त्यापेक्षा कितीतरी अधीक लोक प्रत्येक मंत्र्यांकडे काम करत असल्याचे दिसून येत आहे. मंत्र्यांकडे अनेक धोरणात्मक व गोपनीय बाबी हाताळल्या जातात. मात्र अनधिकृत व्यक्ती या फायली हाताळत असून हे अत्यंत गंभीर असल्याचे मुंडे यांचे म्हणणे आहे. महसूल मंत्री पाटील यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या गोष्टी यापुढे करु नयेत कारण त्यांच्या कार्यालयातील पान निवृत्त अधिकाºयांशिवाय हलत नाही, अशी प्रतिक्रीया विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.गुन्हे दाखल झालेले कार्यरतमंत्री कार्यालयांमध्ये अनेकदा विभागीय चौकशी सुरु असलेले, गुन्हे दाखल झालेले, जामिनावर बाहेर आलेले अधिकारी, कर्मचारी कार्यरत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आल्याचे मुंडे यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेMaharashtraमहाराष्ट्र