कॅम्पाकोलातील अनधिकृत मजल्यांचे वीज, पाणी तोडले
By Admin | Updated: June 23, 2014 18:46 IST2014-06-23T18:45:20+5:302014-06-23T18:46:11+5:30
कॅम्पाकोला कंपाउंडमधील अनधिकृत मजल्यांचे वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडण्यास पालिकेच्या कर्मचा-यांनी सोमवारी सुरूवात केली.

कॅम्पाकोलातील अनधिकृत मजल्यांचे वीज, पाणी तोडले
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २३ - कॅम्पाकोला कंपाउंडमधील अनधिकृत मजल्यांचे वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडण्यास पालिकेच्या कर्मचा-यांनी सोमवारी सुरूवात केली. दुपारी कंपाऊंडमध्ये दाखल झालेल्या कर्मचा-यांच्या पथकाने
रहिवाशांच्या घरातील गॅस, पाणी व वीज कनेक्शन तोडले. कॅम्पोकोलातील रहिवाशांनी गेटवर प्रथम अधिका-यांशी चर्चा करून त्यांच्या कारवाईचे स्वरुप पुन्हा एकदा जाणून घेतले व त्यानंतरच गेट उघडून त्यांना आतमध्ये घेतले
गेल्या तीन दिवसांपासून पालिका प्रशासनाला प्रवेशद्वारावरच थोपवून ठेवणा-या कॅम्पा कोलावासीयांनी रविवारी अखेर प्रशासनासमोर शरणागती पत्करली. कम्पाउंडमधील अनधिकृत मजल्यांचे वीज, पाणी आणि गॅसजोडणी तोडण्यापासून सोमवारी पालिका कर्मचा-यांना अडवणार नसल्याचे रहिवाशांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले होते. त्यानुसार आजपासून कारवाईला सुरूवात झाली.