शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांना अभय, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

By यदू जोशी | Updated: October 7, 2017 05:11 IST

महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील हजारो अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली आहे.

मुंबई : महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील हजारो अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली आहे. या संदर्भातील अधिसूचना येत्या एकदोन दिवसात निघणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी लोकमतला सांगितले.या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठीच्या नियमावलीची अधिसूचना नगरविकास विभागाने २१ जुलै २०१७ रोजी काढली होती. त्यावर नागरिकांचे सूचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यातील योग्य सूचनांचा समावेश करून अधिसूचनेचे अंतिम प्रारुप नगरविकास विभागाने निश्चित केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यास मान्यता दिली असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवड, उल्हासनगरसह राज्यातील लहानमोठ्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या अनधिकृत बांधकामे पाडण्याची पाळी आता येणार नाही. अटी, शर्र्तींच्या आधीन राहून ती नियमित करता येतील.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५२(क) नुसार अनधिकृत बांधकामे प्रशमन शुल्क (कम्पाऊंडिंग चार्जेस) आकारून नियमित करण्याची तरतूद नवीन नियमावलीत करण्यात आली आहे. अर्थात, सरसकट सर्वच अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार नाहीत. त्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. किती रुंदीच्या रस्त्यालगत किती उंचीच्या बांधकामाची परवानगी असेल याचे निकष निश्चित करण्यात आले आहे. त्या निकषानुसार असलेले अनधिकृत बांधकामच नियमित होऊ शकेल. नदी, धरण, कालव्यांसाठीच्या जमिनीवर झालेले अनधिकृत बांधकाम, पूररेषेतील बांधकामे, संरक्षण झोन, हेरिटेज बिल्डिंग, डम्पिंग ग्राऊंड, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात (जसे सीआरझेड, खारफुटी) करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार नाहीत.

बफर झोनमधील अनधिकृत बांधकामे, बांधकामदृष्ट्या असुरक्षित इमारतींतील अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार नाहीत. बांधकामाची परवानगी घेताना पर्यावरण विषयक मंजुरीबाबत शासनाचे काही नियम आहेत. अनधिकृत बांधकामे नियमित करताना सरकारने पर्यावरणविषयक परिणामांचे विश्लेषण केले काय हा वादाचा विषय होऊ शकतो.चटई निर्देशांक (एफएसआय), इमारतीची उंची, मोकळी जागा, छत, रस्त्याच्या रुंदीची अट या बाबत नियमांचे उल्लंघन करून झालेले अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात येणार आहे. एकीकडे बिल्डरांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी सरकारने रेरा कायदा आणला. दुसरीकडे अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी हे सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील मोठे आव्हान असेल.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस