महायुतीत 35 जागांवर एकमत

By Admin | Updated: August 7, 2014 01:23 IST2014-08-07T01:23:41+5:302014-08-07T01:23:41+5:30

महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम संघटनेच्या नेत्यांनी पुढील रणनीती आखण्यासाठी बुधवारी पुण्यात बैठक घेतली.

Unanimity on 35 seats in the Mahayuti | महायुतीत 35 जागांवर एकमत

महायुतीत 35 जागांवर एकमत

>पुणो : शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडून जागावाटपासंदर्भात निरोप येत नसल्याने महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम संघटनेच्या नेत्यांनी पुढील रणनीती आखण्यासाठी बुधवारी पुण्यात बैठक घेतली. यावेळी एकमेकांनी दावा सांगितलेल्या 35 जागांवर एकमत झाले. 
राष्ट्रीय समाज पार्टीचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक रात्री उशिरार्पयत सुरू होती. बैठकीची माहिती देताना जानकर म्हणाले, तीनही पक्षांनी पश्चिम महाराष्ट्रातील 35 जागांवर दावा केला होता. आजच्या बैठकीत एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेण्यात आला. त्यानुसार कोणी कोणत्या जागा लढवायच्या यावर आमचे एकमत झाले. पश्चिम महाराष्ट्रात रासपा आणि स्वाभिमानी यांची ताकद आहे. मराठवाडय़ात शिवसंग्राम पक्षाची ताकद आहे. याशिवाय आमची मुंबईतील काही जागांचीही मागणी आहे. तीनही पक्षांना मिळून 3क् ते 4क् जागांची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही अवास्तव जागा मागत आहोत, असा अपप्रचार केला जात आहे. आम्ही महायुतीमध्ये भक्कम राहणार आहोत. महायुतीमध्ये कोणाचीही स्वतंत्रपणो लढण्याची ताकद नाही, असेही ते म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत माढा मतदारसंघाची मागणी जानकर आणि शेट्टी यांनी केली होती. आता विधानसभा निवडणुकीत एकच मतदारसंघ दोन घटक पक्षांनी मागू नये, यादृष्टीने ही समन्वय बैठक घेतली गेल्याचे शेट्टी यांनी बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Unanimity on 35 seats in the Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.