विविध रंगांमध्ये विद्यार्थ्यांनी रंगविली छत्री

By Admin | Updated: July 1, 2016 02:54 IST2016-07-01T02:54:17+5:302016-07-01T02:54:17+5:30

कोपरखैरणेतील प्रकल्पग्रस्त महिला आघाडी तसेच ज्ञानविकास बिग आर्ट कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अम्ब्रेला पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन केले

The umbrella painted by students in different colors | विविध रंगांमध्ये विद्यार्थ्यांनी रंगविली छत्री

विविध रंगांमध्ये विद्यार्थ्यांनी रंगविली छत्री


नवी मुंबई : कोपरखैरणेतील प्रकल्पग्रस्त महिला आघाडी तसेच ज्ञानविकास बिग आर्ट कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अम्ब्रेला पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखवून छत्री रंगविण्याचे मार्गदर्शनही याठिकाणी करण्यात आले. यावेळी प्रकल्पग्रस्त महिला आघाडीच्या नेत्या जयश्री पाटील, सहसचिव छाया वेटा, शोभा पाटील, प्रतिभा पाटील, बिग आर्टचे हेमंत घरत, सुमंत दाभोळकर, अरुणा टिपणीस, कला शिक्षक राजेंद्र अहिरराव, विद्या अहिरराव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>कोपरखैरणेत विद्यार्थ्यांसाठी अम्ब्रेला पेंटिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सप्तरंगांच्या विविध छटांचा वापर करत रंगवलेल्या या छत्र्या आकर्षक दिसत होत्या. छायाचित्रात रंगवलेल्या छत्र्यांसमवेत विद्यार्थी व मागदर्शक.

Web Title: The umbrella painted by students in different colors